कर्नाटक आणि उत्तर प्रदेश दरम्यान खेळल्या जात असलेल्या रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी संघाचा सलामीवीर मयंक अग्रवाल गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर तो मैदानावरच वेदनेत रडताना दिसला. शिवम मावीचा चेंडू कर्नाटककडून सलामीला आलेल्या मयंक अग्रवालच्या छातीला लागला की तो जमिनीवर पडला. त्याची ही दुखापत टीम इंडियासाठी अडचणीची ठरू शकते.
कर्नाटकच्या संघाकडून सलामीवीर म्हणून फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मयांक अग्रवालला (Mayank Agarwal) आपली चमक दाखवण्यात अपयश आले. अशातच सामन्याच्या पहिल्या सत्रात आपले पहिले षटक टाकायला आलेल्या शिवम मावीच्या (Shivam Mavi) षटकातील शेवटच्या चेंडूवर मयांकला दुखापत झाली असल्याचे दिसून आले. षटकाचा शेवटचा चेंडू मावीने शॉर्ट टाकला. त्यावेळी त्याला लेग साईडला खेळण्याच्या प्रयत्नात पहिले चेंडू मयांकच्या हाताला आणि नंतर छातीत लागला.
मयंक अग्रवाल शिवम मावी की गेंद पर हुए चोटिलhttps://t.co/Pzpv0utrNy
— Rubin Ahmad (@rubinahmad92) June 6, 2022
चेंडू लागल्यावर लगेचच मयांकच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले. त्याच्या हावभावांवरून त्याला जोरात दुखापत झाले असल्याचे दिसून आले. त्यानंतर लगेचच संघाचे फिजिओ धावत मैदानावर दाखल झाले. त्यावेळी त्याची तपासणी करत असताना सुद्धा मयांक मैदानावर झोपून दुखापतीत असल्याचे ठळकपणे दिसून आले.
दरम्यान, या सामन्यात ४१ चेंडूंचा सामना करताना त्याने फक्त एक चौकार मारला. त्यामुळे त्याला केवळ १० धावा करता आल्या. फलंदाजी करताना झगडत असलेल्या मयंकलाही चेंडू लागल्याने त्याच्या छातीला दुखापत होऊन तो थेट बाहेर गेला. त्यामुळे त्याला पुढील सामना खेळता आला नाही.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धडाकेबाज क्रिकेटपटू असूनही ‘दारूडा’ म्हणून ओळखला जाणारा एँड्र्यू सायमंड्स
काय सांगता! तब्बल १२ वर्षांनंतर एबी पहिल्यांदा झाला होता ‘गोल्डन डक’
ट्रेंडिंगला फक्त एकच नाव, ते म्हणजे ‘शिवम’, वाचा IPL 2022 गाजवणाऱ्या दुबेबद्दल