दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिविलियर्स अनेकांचा आवडता खेळाडू आहे. एबीला क्रिकेटमध्ये त्याच्या प्रभावित करणाऱ्या शॉट्समुळे मिस्टर ३६० अशी पदवी दिली गेली आहे. मात्र, याच एबीच्या नावावर क्रिकेटमध्ये अनेक दिग्गजांना लागनवेल अशा विक्रमाची नोंद आहे. तो विक्रम म्हणजे आपल्या कारकिर्दीत मात्र, एक वेळा गोल्डन डक म्हणजेच पहिल्या चेंडूवर एकही धाव न काढता बाद करण्याचा विक्रम आहे.
एबीने फेब्रुवारी २००५ मध्ये आपल्या एकदिवसीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर १२ वर्षांनंतर ७ जून २०१७साली झालेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तानच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात एबी पहिल्यांदा गोल्डन डक म्हणजेच एकही धाव न काढता त्याच्या जावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याआधी कधीही एबी पहिल्या चेंडूवर बाद झाला नव्हता.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ७व्या लीग सामन्यात पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ आमने-सामने होते. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या क्विंटन डिकॉक आणि हाशिम आमला यांनी आफ्रिकेला जोरदार सुरुवात दिली. मात्र, ४० धावांवर आमला बाद झाला त्यानंतर लगेचच ६० धावांवर दुसरा सलामीवीर क्विंटन डिकॉक बाद झाला. त्यावेळी फलंदाजीसाठी एबी डिविलियर्स आला. मात्र १५व्या षटकातील चौथ्या चेंडूवर गोलंदाज इमाद वसीमने फएकलेल्या बॉलवर एबी मोहम्मद हाफिजच्या हाते झेलबाद झाला होत.
दरम्यान, या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ५० षटकांत डेविड मिलरच्या नाबाद ७५ धावांच्या जोरावर ८ बाद २१९ धावा करण्यास यशस्वी झाला. त्याच्या प्रत्युत्तरात फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तान संघाला २७ षटकांत ३ बाद ११९ धावा करता आल्या. त्यानंतर सामन्यात पावसाने व्यत्य आणला. त्यानंतर डकवर्थ लुईस प्रकाराने पाकिस्तानच्या संघाला विजय प्राप्त झाला.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘कसोटीची डेब्यू कॅप मिळाली, मात्र एक खंत राहीलच’, मोहम्मद सिराज हळहळला
आयपीएलला मोठी करणारे पाच श्रीलंकन लिजेंड, यांच्याबद्दल जाणून घेतलंच पाहिजे
आज विराट नसता, तर ‘तो’ नक्कीच असता, वाचा सीएसकेच्या यशाच्या अनसंग हीरोबद्दल