भारतीय संघाने काहीदिवसांपूर्वीच न्यूझीलंडचा कसोटी मालिकेत १-० अशा फरकाने पराभव केला. या मालिकेत भारताकडून केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत मयंक अगरवाल आणि शुबमन गिल यांनी सलामीला फलंदाजी केली होती. पण, आता भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात ३ सामन्यांची कसोटी मालिका होणार असून रोहित आणि राहुल यांचेही पुनरागमन होणार आहे. त्यामुळे आता सलामीला कोणती जोडी खेळणार, असे प्रश्न उपस्थित होत आहे. याबद्दल सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने त्याच्या फलंदाजीच्या क्रमाबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
मयंक अगरवालने (Mayank Agarwal) म्हटले आहे की तो जरी सलामीवीर असला, तरी तो मधल्या फळीत देखील खेळायला तयार
न्यूझीलंड (New Zealand) विरुद्धच्या कसोटी सामन्यात देखील त्याच्या जागेवर प्रश्नचिन्ह होतं. पण वानखेडे कसोटीत जबरदस्त पुनरागमन केलं. त्याने पहिल्या डावांत १५० आणि दुसऱ्या डावांत ६२ धावा केल्या. यासाठी त्याला सामनावीर देऊन गौरवण्यात देखील आले.
परंतु, उत्कृष्ट प्रदर्शन करूनही त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सलामीवीर म्हणून फलंदाजी नाही करता येणार असं दिसतंय. कारण दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी (India Tour Of South Africa) केएल राहुल (KL Rahul) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) संघात पुनरागमन करणार आहेत. त्यामुळे मयंकला त्याची जागा कदाचित गमवावी लागू शकते.
कुठल्याही क्रमांकावर खेळू शकतो- मयंक अगरवाल
स्पोर्ट्सकीडासोबत बोलताना मयंक म्हणाला की, “इमानदारीने सांगतो मी कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करायला तयार आहे. खेळाडू म्हणून संघात असायला हवं, हे प्रत्येकालाच वाटतं. आणि मला सलामीवीर म्हणूनच प्राधान्य देण्यात यावं, असं देखील काही नाही. संघाकडून जी भूमिका बजावण्यासाठी सांगण्यात येईल, ती पार पाडण्याचा नक्कीच प्रयत्न करीन.”
अगरवालने फक्त एकदा मधल्या फळीत फलंदाजी केली आहे. यावर्षी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गॅबा कसोटीत (Gabba Test) त्याने पहिल्या डावांत ५व्या आणि दुसऱ्या डावांत ६व्या क्रमांकावर फलंदाजी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
पीएसएल २०२२ रिटेंशन: आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ विदेशी खेळाडूंना लागली लॉटरी
ज्याच्या नेतृत्वात आयपीएल खेळला, त्याचीच विकेट घेण्यासाठी उत्सुक आहे ‘हा’ श्रीलंकेचा युवा खेळाडूू
‘मिर्झापूर’च्या ‘कालीन भैय्या’सोबत दिसला एमएस धोनी; भन्नाट नवीन लूकसह ‘माही’चा फोटोही व्हायरल