पाकिस्तानमधील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या पाकिस्तान सुपर लीग (PSL) या स्पर्धेचा सातवा हंगाम २७ जानेवारीपासून सुरू होईल. या हंगामासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने PCB) तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्व संघांना आपापल्या खेळाडूंना रिटेन करण्यास सांगितले गेले होते. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त ८ खेळाडूंना रिटेन करण्याची मुभा देण्यात आलेली. गतविजेत्या मुलतान सुलतान्स (Multan Sultans) व क्वेटा ग्लॅडिएटर्स या संघांनी प्रत्येकी ७ खेळाडूंना कायम केले. रिटेन खेळाडूंची यादी देण्याची अखेरची तारीख ९ डिसेंबर होती.
पीएसएल २०२२ साठी सर्व संघांना चार श्रेणींमध्ये खेळाडू रिटेन करायचे होते. यामध्ये प्लॅटिनम, डायमंड, गोल्ड व सिल्वर अशा श्रेण्या होत्या. आगामी हंगामात प्रत्येक संघ जास्तीत जास्त १८ खेळाडू आपल्या संघात ठेवू शकतो.
या रिटेंशनमध्ये एकूण १२ खेळाडू सर्वोच्च प्लॅटिनम श्रेणीमध्ये रिटेन केले गेले. यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान, असिफ अली, इमाद वासिम यांसारख्या पाकिस्तानी खेळाडूंसह लियाम लिव्हींगस्टोन, रायली रूसो, जेम्स व्हिन्स व राशिद खान या विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. पीएसएलचा पुढील हंगाम पाकिस्तानमध्ये २७ जानेवारीपासून सुरू होईल. पाकिस्तानचा दिग्गज अष्टपैलू शाहिद आफ्रिदी हा अखेरच्या वेळी ही स्पर्धा खेळणार आहे. तो क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाचे प्रतिनिधित्व करेल.
रिटेन केले गेलेले खेळाडू-
पेशावर झाल्मी-
लियाम लिव्हींगस्टोन, वहाब रियाझ ( प्लॅटिनम), हैदर अली, शोएब मलिक, शेरफन रुदरफोर्ड (डायमंड), हुसेन तलत, साकिब मेहमूद (गोल्ड), टॉम कोहलर-कॅडमोर (सिल्वर)
मुलतान सुलतान्स-
मोहम्मद रिझवान, रायली रूसो (प्लॅटिनम), इम्रान ताहीर, सोहेब मकसूद (डायमंड), खुशदील शाह (गोल्ड), शहानवाज धनी, शान मसूद (सिल्वर)
क्वेटा ग्लॅडिएटर्स – जेम्स व्हिंन्स, सरफराज अहमद (प्लऍटिनम), इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज (डायमंड), शाहिद आफ्रिदी, मोहम्मद हसनैन, नसीम शाह (गोल्ड)
इस्लामाबाद युनायटेड – आसिफ अली, हसन अली (प्लॅटिनम), फहीम अश्रफ, शादाब खान (डायमंड), ऍलेक्स हेल्स, आजम खान, मोहम्मद वसीम जूनियर (गोल्ड), पॉल स्टर्लिंग (सिल्वर)
कराची किंग्स – बाबर आझम, इमाद वसिम (प्लॅटिनम), मोहम्मद आमिर, मोहम्मद नबी (डायमंड), जो क्लार्क, आमिर यामीन, शारजील खान (गोल्ड), मोहम्मद इलियास (सिल्वर)
लाहोर कलंदर्स – राशिद खान, शाहीन शाह आफ्रीदी (प्लॅटिनम), हारिस रऊफ, डेविड वीजे, मोहम्मद हफीज (डायमंड), अहमद दनियाल, सोहेल अख्तर, जीशान अश्रफ (सिल्वर
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/aus-vs-eng-1st-test-alex-carey-is-the-first-player-to-take-eight-catches-on-test-debut/
धक्कादायक! सरावानंतर २७ वर्षीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, अहमदनगरमधील घटना
गॅबा कसोटीत ८९ धावांची खेळी करणाऱ्या रुटची पाँटिंगशी बरोबरी, आता नजर क्लार्कच्या विक्रमावर