---Advertisement---

भारतीय खेळाडूचा टी२० लीगमध्ये शतकी तडाखा, अजून आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये पदार्पणही नाही झाले

On: शनिवार, ऑगस्ट 13, 2022 2:29 PM
Prithvi Shaw and Mayank Agarwal
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. दुसरीकडे आशिया चषकासाठी संधी न मिळालेले भारतीय क्रिकेटपटू महाराजा ट्रॉफी टी२० लीग अर्थात पूर्वाश्रमीच्या कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये आपला हात आजमावत आहेत. टी२० स्वरूपात होत असलेल्या या लीगमध्ये भारताचा सलामीवीर मयंक अगरवाल याची बॅट चांगलीच तळपली आहे. मयंकने बेंगळुरू ब्लास्टर्स संघाकडून कर्णधार खेळी करत संघाला ९ विकेट्सने मोठा विजय मिळवून दिला आहे. 

महाराजा ट्रॉफी (Maharaja Trophy T20 League) या टी२० लीगमध्ये मयंक बेंगळुरू ब्लास्टर्स (Bengaluru Blasters) संघाचे नेतृत्त्व करत आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली बेंगळुरू संघाने शुक्रवारी (१२ ऑगस्ट) शिवमोग्गा स्ट्राईकर्स संघावर विजय मिळवला. बेंगळुरू संघाच्या या विजयात मयंकचा मोठा वाटा राहिला. त्याने या सामन्यात शतकी खेळी केली.

शिवमोग्गा संघाच्या १७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मयंकने केवळ ४९ चेंडूत नाबाद १०२ धावा (Mayank Agarwal Century) चोपल्या. या दमदार शतकी खेळीसाठी त्याने ६ षटकार आणि १० चौकारही मारले. अर्थात केवळ बाउंड्रींच्या जोरावर त्याने ७६ धावा फटकावल्या. ही शतकी खेळी त्याने २०८.१६ च्या स्ट्राईक रेटने केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर बेंगळुरू संघाने १५.४ षटकातच हा सामना जिंकला.

महाराजा ट्रॉफीत शतक करणारा बनलाय दुसरा फलंदाज
या शतकासह मयंक महाराजा ट्रॉफी टी२० लीगमध्ये शतक करणारा दुसराच फलंदाज बनला आहे. मयंकपूर्वी गुलबर्ग मिस्टिक्स संघाकडून रोहन पाटील याने महाराजा ट्रॉफीतील पहिले शतक केले होते. त्याने म्हैसुरू वॉरियर्स संघाविरद्ध हे शतक केले होते. याबरोबरच त्याने या स्पर्धेतील सर्वाधिक धावांसाठी मिळणारी ऑरेंज कॅपही आपल्या डोक्यावर सजवली आहे. मयंकच्या या स्पर्धेतील ४ डावात २४१ धावा झाल्या आहेत.

दरम्यान ३१ वर्षीय मयंक भारताच्या कसोटी संघाचा विश्वासू सलामीवीर आहे. परंतु मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याला फार कमी संधी मिळाल्या आहेत. २०२० मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर तो फक्त ५ सामने खेळून संघाबाहेर झाला. २ वर्षांपूर्वी म्हणजेच २०२० मध्येच त्याने शेवटचा वनडे सामना खेळला होता. तसेच टी२० क्रिकेटमध्ये अद्याप त्याला पदार्पणाची संधीही मिळालेली नाही.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘मला फक्त २०२३चा विश्वचषक खेळायचा आहे’, असे म्हणत भारताच्या सलामीवीराने सांगितला त्याचा फ्युचर प्लान

‘भारताजवळ त्याच्यापेक्षा चांगले गोलंदाज’, आशिया चषकातून शमीला डावलण्याच्या निर्णयावर मोठी प्रतिक्रिया

भारतीयांना नडणाऱ्या मॅकॉयचा न्यूझीलंडविरुद्ध ‘अष्टपैलू’ खेळ, टी२०तील अद्भुत विश्वविक्रमाला गवसणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---