दुबईच्या मैदानावर रविवारी (१९ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात झालेला सामना ऐतिहासिक ठरला. प्ले ऑफच्या शर्यतीत पिछाडीवर असलेल्या पंजाबने या सामन्यात जबरदस्त प्रदर्शन करत दूसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईचा विजयरथ रोखला. दरम्यान मयंक अगरवाल सुपर ओव्हरमध्ये नेत्रदिपक क्षेत्ररक्षण केले. त्याच्या या अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे.
झाले असे की, प्रथम फलंदाजी करताना मुंबईने १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबनेही २० षटकात १७६ धावाच केल्या. त्यामुळे बरोबरी केली आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईच्या जसप्रीत बुमराह आणि पंजाबच्या मोहम्मद शमीच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे पुन्हा सामना अनिर्णीत राहिला आणि दूसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली.
त्यामुळे दूसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईकडून फलंदाजी करण्यासाठी कायरन पोलार्ड आणि हार्दिक पंड्या आले. या दोन्ही धुरंधरांनी त्या ६ चेंडूत जोरदार फटकेबाजी केली. पण पोलार्डला दूसऱ्या सुपर ओव्हरमधील शेवटच्या चेंडूला सीमारेषेबाहेर पाठवण्यात अपयश आले. त्याने ख्रिस जॉर्डनचा शेवटचा चेंडू पूर्ण ताकदीने डिप विकेटच्या बाजूला टोलवला. पण तिथे सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या मयंकने हवेत मोठी उडी घेत चेंडूला सीमारेषेच्या आत फेकले आणि तो स्वत: तोल न सांभळल्यामुळे सीमारेषेच्या बाहेर पडला.
तेवढ्याच डिप स्क्वेअरकडे उभा असलेला अर्शदिप सिंग धावत आला आणि त्याने चेंडू खेळपट्टीकडे फेकला. त्यामुळे मुबंईला शेवटच्या चेंडूवर ४ किंवा ६ धावा न मिळता केवळ २ धावा मिळाल्या.
https://twitter.com/urmilpatel21/status/1317897646703579137?s=20
Mayank u beauty ❣️❣️#MIvKXIP #IPLinUAE #MayankAgarwal #SuperOver pic.twitter.com/OPO8N65aoY
— Alok Srivastava🇮🇳🇮🇳 (@BrightBeast1) October 18, 2020
How many retweets for this effort by @mayankcricket ?#Dream11IPL pic.twitter.com/RFVixzflDr
— IndianPremierLeague (@IPL) October 18, 2020
WTF fielding 😳😳😳😳 pic.twitter.com/U3WoLomoPB
— Ankit kumar (मोदी जी का परिवार ) (@bgp_ankit) October 18, 2020
मयंकच्या या अप्रतिम आणि अनपेक्षित क्षेत्ररक्षणाला पाहिल्यानंतर चाहत्यांनी तोंडात बोटे घातली. कित्येक चाहत्यांनी त्याचा चेंडू अडवतानाचा तो व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत मयंकवर कौतुकांचा वर्षाव केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
तू अजून थोडे षटकार खा आणि भारतात परत ये! युवराजने भारतीय गोलंदाजाची घेतली फिरकी
रोहित, रैना, विराटलाही इतक्या वर्षात जे जमलं नाही ते केएल राहुलने करुन दाखवले
सुपर ओव्हर पे सुपर ओव्हर! एकाच दिवसात ३ सुपर ओव्हर झाल्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पडला पाऊस
ट्रेंडिंग लेख-
दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…
आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’