अजिंक्य रहाणेच्या झुंजार शतकी खेळीमुळे आणि भारतीय गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमुळे ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत भारताने ८ विकेट्सने ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेला हा सामना जिंकत भारताने मालिकेत १-१ ने बरोबरी केली आहे. आता या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामने नव्या वर्षात होतील. परंतु या सामन्यादरम्यान भारताचा सलामीवीर मयंक अगरवालची फलंदाजी सुमार राहिली. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्याविषयी जबरदस्त मिम्स व्हायरल होत आहेत.
या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात मयंक भोपळाही न फोडता मैदानाबाहेर पडला. दुसऱ्या डावात देखील सलामीला फलंदाजी करताना तो १५ चेंडूंचा सामना करत अवघ्या ५ धावांवर झेलबाद झाला. त्यामुळे या २९ वर्षीय फलंदाजाचा खराब फॉर्म पाहता त्याला तिसऱ्या कसोटी सामन्यात संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.
याबरोबरच आयपीएलदरम्यान दुखापती झालेला रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो सध्या सिडनीमध्ये आहे. लवकरच त्याचा १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण होऊन तो भारतीय कसोटी संघासोबत जोडला जाणार आहे. अशात अगरवालची जागा रोहितला दिली जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणून बऱ्याच चाहत्यांनी रोहितच्या नावानेही अगरवालविषयी मिम्स शेअर केले आहेत.
येथे पाहा मिम्स-
#AUSvIND
Mayank Agarwal continuously failing in test match
Indian team management (in test) pic.twitter.com/0MTfY3B4xz— SAHIL³ (@Sa_hil0) December 29, 2020
Mayank Agarwal failing continuously…
Mohammed Kaif- pic.twitter.com/Xx1hbzu9Zr— Kapil Saxena (@_ManOfCulture) December 29, 2020
Chin up Mayank Agarwal #INDvAUS #MayankAgarwal pic.twitter.com/LmSCC61c5n
— Charles Babbage🇮🇳 (@DMahto19) December 29, 2020
Mayank Agarwal in next match after Rohit Sharma is available. pic.twitter.com/xWCVqLKOBy
— Viru Sharma (@183_Mirpur) December 29, 2020
https://twitter.com/HitmanSharma12r/status/1343768933170434048?s=20
#INDvAUS#TestCricket#AjinkyaRahane
#RohithSharma all set to replace #MayankAgarwal in 3rd test.@ImRo45#vadapaav is love😍😍 pic.twitter.com/yEitnw966h
— Kunal Dhakne (@DhakneKunal) December 29, 2020
Take a bow #AjinkyaRahane #INDvAUS #MayankAgarwal #RohithSharma #Shubmangill siraj pic.twitter.com/qXCQMv2xC7
— Digital keeda (@digitalkeeeda) December 29, 2020
Prithvi Shaw, Mayank Agarwal and Wridhiman Shah watching Shubman Gill bat..#INDvAUS pic.twitter.com/gN2Y6Eq55d
— Michael Scott (@the_sashiks) December 29, 2020
Who will replace Mayank Agarwal in the next test #AUSvIND #INDvAUS #AUSvsIND #INDvsAUS #Cricket
RT for Rohit Sharma
Like for KL Rahul pic.twitter.com/lwCwlHcWvV— Anushmita⁷ (@anushmita7) December 29, 2020
Prithvi Shaw after seeing Mayank Agarwal's performance. #INDvAUS #AUSvINDtest pic.twitter.com/YDhs5D9OPh
— The Sarcastic Jerk (@The_Sarcastic_J) December 29, 2020
https://twitter.com/corona_warrior/status/1343762898749833217?s=20
Mayank Agarwal's last six Test innings: 7, 3, 17, 9, 0, 5
Rohit Sharma's last six Test innings: 176, 127, 14, 212, 6, 21
Rohit is Back pic.twitter.com/QooDEVOIhB
— Jitendra Singh Chandel (@JitendraSinghMP) December 29, 2020
Prithvi Shaw watching Mayank Agarwal#INDvAUS pic.twitter.com/SXTfXu7SSV
— Pulkit Patel (@pulkitjpatel) December 26, 2020
बॉक्सिंग डे कसोटीतील आकडेवारी
-पहिला डाव
बॉक्सिंग डे सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघ फक्त १९५ धावाच करू शकला. या डावात ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅब्यूशाने याने सर्वाधिक ४८ धावा केल्या. तर ट्रॅविस हेडनेही ३८ धावांचे योगदान दिले. भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर फिरकीपटू आर अश्विनने ३ आणि मोहम्मद सिराजने २ विकेट्सचे योगदान दिले.
त्यानंतर भारताकडून पहिल्या डावात कर्णधार अजिंक्य रहाणेने तीन आकडी खेळी करत संघाला १३१ धावांची आघाडी मिळवून दिली. त्याने २२३ चेंडूत १२ चौकार ठोकत ११२ धावा केल्या. अष्टपैलू रविंद्र जडेजानेही ५७ धावा आणि शुबमन गिलने ४५ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना मिचेल स्टार्क आणि नॅथन लायनने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
-दुसरा डाव
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज अर्धशतक करेपर्यंतही टिकू शकला नाही. कॅमरॉन ग्रीने या डावात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक ४५ धावा केल्या. तर मॅथ्यू वेडने ४० धावांची खेळी केली. उर्वरिच फलंदाज ३० धावांच्या आतच पव्हेलियनला परतले. भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. सोबतच जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना तंबूत धाडले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने भारतापुढे अवघे ६९ धावांचे लक्ष्य ठेवले.
ऑस्ट्रेलियाच्या या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर मयंक अगरवाल आणि चेतेश्वर पुजारा लवकरच बाद झाले. परंतु शुबमन गिलने ३५ धावा आणि अजिंक्य रहाणेने २७ धावा करत ८ विकेट्सने सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
डावखुऱ्या फलंदाजांसाठी आर अश्विन धोक्याची घंटा, कसोटीत केलाय हटके ‘विश्वविक्रम’
डोंगरा एवढं दुःख पचवून तो लढला आणि जिंकला सुद्धा!