---Advertisement---

Mayank Agarwal । कर्नाटकचा कर्णधार ICUमध्ये भरती, अचानक बिघडली तब्येत

On: मंगळवार, जानेवारी 30, 2024 7:06 PM
Mayank Agarwal
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज मयंक अगरवाल याच्याशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. स्टार क्रिकेटपटूची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला तत्काळ रुग्णालयात भरती केले गेले. माहितीनुसार रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये मयंकला उपचार सुरू आहेत. मंयक अगरतलावरून सूरतच्या दिशेने निघाला होता आणि अचानक त्याच्या तब्येत बिघडल्याचे, सांगितले जात आहे.

सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची रणजी ट्रॉफी खेळली जात आहे. रणजी ट्रॉफी 2024 (Ranji Trophy 2024) मध्ये मयंक अगरवाल (Mayank Agarwal) आपल्या कर्नाटक संघाच्या कर्णधाराची भूमिका पार पाडत आहे. रणजी हंगामा सुरू असतानाच मयंकला आयसीयूमध्ये भरती करण्याची वेळ मंगळवारी (30 जानेवारी) आली.

माध्यमांतील वृत्तांनुसार मयंक अगरतलावरून सूरतला चालला होता. तेव्हाच फ्लाईटमध्ये त्याला त्रास होऊ लागला. माहितीनुसार मंयकच्या छातीत त्रास होऊ लागला होता. यानंतर भारतीय क्रिकेटपटूला तत्काळ विमानातून खाली उतरवले गेले आणि रुग्णालयात देखाल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी मयंकला थेट आयसीयूमध्ये भरती केले आहे. पण आता त्याच्या तब्येतीबाबत कोणतीच चिंतेची बाब नाही, असेही सांगितले गेले आहे. सध्या तो अगरतलाच्या आयएमएस रुग्णालयात उपचार घेत आहे. (Mayank Agarwal was admitted to the ICU due to sudden health deterioration)

महत्वाच्या बातम्या – 
मोठी बातमी! जय शहा ACC अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत, डोक्यात आहे मोठा प्लॅन
मोठी बातमी! विमान प्रवासादरम्यान दारू नेल्याने क्रिकेटपटू अडचणीत, क्रिकेट बोर्ड ऍक्शन मोडमध्ये

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---