आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (4 मे) सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा सामना खेळला गेला. हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादसमोर 172 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्सचा सलामीवीर मयंक अगरवाल हा पुन्हा एकदा अपयशी ठरला.
प्रथम फलंदाजी करताना केकेआरसाठी रिंकू सिंग, नितिश राणा व आंद्रे रसेल यांनी महत्त्वपूर्ण योगदान देत संघाला 7 बाद 171 पर्यंत पोहोचवले. या धावांचा पाठलाग करताना हैदराबादला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र, अभिषेक शर्मा व मयंक अगरवाल ही जोडी फार मोठी सलामी देऊ शकली नाही. या जोडीने 2.5 षटकात 29 धावा केल्या. मयंकला हर्षित राणाने बाद केले. त्याने 11 चेंडूवर 18 धावा केल्या.
या हंगामात सनरायझर्स हैदराबादला मयंक अगरवालकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मयंकला पंजाबने रिलीज केल्यानंतर हैदराबादने तब्बल 8.25 कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले होते. मात्र, त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा तो पूर्ण करू शकला नाही. त्याने या हंगामात आतापर्यंत 9 सामने खेळताना 187 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 20.7 इतकी साधारण असून, स्ट्राइक रेट 114 इतका राहिला आहे. विशेष म्हणजे यामध्ये एकाही अर्धशतकाचा समावेश नाही. आयपीएल इतिहासात कमीत कमी 100 सामने खेळलेल्या खेळाडूंमध्ये त्याची सरासरी सर्वात खराब आहे.
या सामन्याचा विचार केल्यास हैदराबादने आपल्या घरच्या मैदानावर चाहत्यांना निराश केले. विजयासाठी मिळालेले 172 धावांचे आव्हान हेन्रिक क्लासेन, ऐडन मार्करम व अब्दुल समद यांच्या योगदानामुळे जवळ आले होते. मात्र, वरूण चक्रवर्ती याने अखेरच्या षटकात 9 धावांचा बचाव करताना केकेआरला विजय मिळवून दिला.
(Mayank Agarwal Yet Another Flop Inning In IPL 2023 For Sunrisers Hyderabad)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केदारने सांगितली आयपीएल कमबॅकची कहाणी! म्हणाला, “मी कॉमेंट्री करत होतो आणि…”
चौथ्या विजयासाठी केकेआर-सनरायझर्सची झुंज! घरच्या मैदानावर हैदराबादची प्रथम गोलंदाजी