भारतीय संघाचा स्टार फलंदाज मयंक अगरवाल सध्या रुग्णालयात आहे. सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीत मयंक कर्नाटक संघाच्या कर्णधाराची भूमिका पार पाडत आहे. मंगळवारी (30 जानेवारी) आगरतलावरून सूरतला जाण्यासाठी मयंक विमानात बसला होता. पण अचानक तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात भरती करावे लागले. आता या प्रकरणाला नवीन वळण येताना दिसत आहे. अगरवालने याच पार्श्वभूमीवर पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे.
कर्नाटक संघाला आपला पुढचा सामना सूरतमध्ये रेवलेज संघाविरुद्ध खेळायचा आहे. तर आपला शेवटचा सामना कर्नाटकने त्रिपुरा संघाविरुद्ध अगरतलामध्ये खेळला. त्रिपूरा संघाला 29 धावांनी मात दिल्यानंतर मंगळवारी कर्नाटक संघ सूरतसाठी रवाना झाला. पण कर्णधार मयंक अगरवाल () याला संघासोबत मुक्कामाच्या दिशेने जाता आले नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार अगरवालला विमानत बसल्यानंतर त्याच ठिकाणी उलट्या झाल्या आणि नंतर तो खाली उतरला.
आता या प्रकरणात अशी माहिती समोर येत आहे की, मयंकने याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. भारतीय क्रिकेटपटूने त्याच्याविरोधात कट रचला गेल्याचे आरोपही केली आहेत, असे सांगितले जात आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार मयंकसह संपूर्ण कर्नाटक संघ इंडियो एयरलाईनच्या विमानातून सूरतसाठी निघाले होते. विमानात गेल्यानंतर मयंकने त्याच्या सीटवर ठेवलेल्या पाण्याच्या पाउचमधील पाणी पिले. पण याच पाण्यामुळे त्याला त्रास झाल्याचे समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर मयंकने रुग्णालयात असतानाच आपल्या मॅनेजरला सांगून तक्रार दाखल केली आहे.
Mayank Agarwal has filed a police complaint to investigate the matter after he drank poisonous liquid from a pouch in the flight. pic.twitter.com/yAhlWCz1QS
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 31, 2024
त्रिपुरला पोलीस अधीक्षक किरन कुमार यांच्याकडून याविषयी माहिती मिळाली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, “मयंक अगरवाल एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. पण त्यांच्या मॅनेजरने प्रकरणाचा तपास होण्यासाठी न्यू कॅपिटल कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.”
(Mayank Agarwal’s health worsened after drinking the water in the plane. Now the cricketer has filed a police complaint in this regard)
महत्वाच्या बातम्या –
महाराष्ट्राचे सुवर्णपदकाचे अर्धशतक, पलक जोशीने स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडून जिंकले गोल्ड
जमशेदपूर एफसी नव्या सुरुवातीसाठी सज्ज, नॉर्थईस्ट युनायटेडचे आव्हान