---Advertisement---

टीम इंडियाचा हा खेळाडू मैदानात रचतोय धावांचा डोंगर आणि हॉटेलमध्ये खेळतोय पबजी!

---Advertisement---

इंदोर। भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात होळकर क्रिकेट स्टेडियमवर पहिला कसोटी सामना(1st Test) सुरु आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (15 नोव्हेंबर) भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने(Mayank Agarwal)द्विशतकी खेळी केली.

त्याने भारताकडून शुक्रवारी पहिल्या डावात खेळताना 330 चेंडूत 243 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 28 चौकार आणि 8 षटकार मारले. त्याच्या या खेळीनंतर तो शुक्रवारीच्या खेळीनंतर पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता.

यावेळी त्याला एका पत्रकाराने विचारले की “अशी खास कामगिरी केल्यानंतर तू हॉटेलमध्ये संध्याकाळी काय करतो? तू तूझ्या खेळीची हायलाईट्स पाहतो का? किंवा तूला एखादा चित्रपट पाहणे आवडते? किंवा नेटफ्लिक्स शो? मयंक काय करतो?”

या प्रश्नावर मयंकनेही गमतीशीर उत्तर दिले. “मयंक पबजी खेळतो”, असे हसून मयंकने उत्तर दिले. त्याचे हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच हसू आले.

मयंकने कसोटी कारकिर्दीतील दुसरे द्विशतक केले आहे. विशेष म्हणजे त्याने केवळ 8 वा कसोटी सामना खेळताना ही कामगिरी केली आहे.

या सामन्यात भारताने पहिला डाव 6 बाद 493 धावांवर घोषित केला आहे. त्यामुळे भारताने पहिल्या डावात 343 धावांची आघाडी घेतली आहे. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 150 धावांवर सर्वबाद झाला होता.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---