अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना गुरुवारपासून (४ मार्च) सुरू झाला आहे. पहिल्या दिवसावर भारतीय संघाने पूर्णपणे वर्चस्व गाजवत ही कसोटी जिंकण्यासाठी पहिले पाऊल टाकले. दरम्यान, या सामन्यातून पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद सिराजने पुन्हा एकदा आपले वैविध्यपूर्ण सेलिब्रेशन केले. मात्र, त्यावेळी मयंक अगरवाल मैदानावर उपस्थित असल्याचे पाहून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले.
सिराजचे सेलिब्रेशन
भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने वैयक्तिक कारणाने चौथ्या कसोटीतून माघार घेतल्याने मोहम्मद सिराजला हा सामना खेळण्याची संधी मिळाली. सिराजने आपल्या स्विंग गोलंदाजीचे प्रात्यक्षिक दाखवत इंग्लंडचा कर्णधार जो रूटला ५ धावांवर पायचीत केले.
त्यानंतर, त्याने आपल्या वडिलांना आठवत आपले वैविध्यपूर्ण सेलिब्रेशन केले. विशेष म्हणजे त्यावेळी अंतिम अकरामध्ये सामील नसलेला मयंक अगरवाल मैदानावर उपस्थित होता. सिराजने हे सेलिब्रेशन मयंकसोबत केले. त्यानंतर, जॉनी बेअरस्टोला बाद केल्यानंतर त्याने अशाच प्रकारचे सेलिब्रेशन अक्षर पटेलसोबत केले.
#TeamIndia turning the heat up 🔥
3️⃣ wickets down 🏴 #INDvENG @Paytm
Follow the match 👉 https://t.co/9KnAXjaKfb pic.twitter.com/XVscu0ifuE
— BCCI (@BCCI) March 4, 2021
THAT wicket feeling 😌💙@Paytm #INDvENG #TeamIndia
Follow the match 👉 https://t.co/9KnAXjaKfb pic.twitter.com/4Cds5jjz23
— BCCI (@BCCI) March 4, 2021
सोशल मीडियावर चर्चेला आले उधाण
मयंक आणि सिराजच्या या एकत्रित सेलिब्रेशननंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले,
‘जेव्हा सिराज बळी घेतो तेव्हा मयंक कायम मैदानावर कसा हजर असतो?’
It's strange how Mayank is on field every time Siraj takes a wicket.. He just came on during drinks break… just for this celebration 🤘#INDvENG #TeamIndia
— Kshitij Sinha (@kshitij_sinhaha) March 4, 2021
अन्य एका वापरकर्त्याने छायाचित्र प्रसिद्ध करत लिहिले, ‘कृपया, माझा मयंक मला द्या’
https://twitter.com/viratslight/status/1367341410513391616
आणखी एका ट्विटर खात्यावरून मयंक व सिराजच्या सेलिब्रेशनचे छायाचित्र प्रसिद्ध करून लिहिण्यात आले आहे की, ‘म्हणजे जेव्हा सिराज बळी मिळवतो तेव्हा मयंक मैदानावर येतोच. त्यांचे सेलिब्रेशन आम्हाला आवडते.’
That Mayank-Siraj Celebration is a thing of beauty ❤️ pic.twitter.com/lzFHjG4aiD
— Hamidul (@yourshamidul) March 4, 2021
सिराज ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. मात्र, देशहिताला प्राधान्य देत त्याने तेथेच राहण्याचा निर्णय घेतलेला. त्यानंतर, तो प्रत्येक वेळी फलंदाजांना बाद केल्यानंतर आपल्या वडिलांची आठवण म्हणून हे खास सेलिब्रेशन करत असतो.
Mayank -suraj duo 💛 ! Today's favorite scene from match #INDvsENG #mayank #siraj https://t.co/4TXD5pAvT7
— Tani (@Spellbounded17) March 4, 2021
Wonder how Mayank is always on the field when Siraj takes the wicket. Always good to see their celebration. #INDvEND https://t.co/u7tkc4GqKd
— Ronak Vora (@ronak_hv) March 4, 2021
याआधी मयंकसोबत केले होते असे सेलिब्रेशन
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मेलबर्न कसोटीतून आपले आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण करणाऱ्या सिराजने आपला पहिला कसोटी बळी म्हणून ऑस्ट्रेलियाच्या मार्नेस लॅब्युशेनला बाद केल्यानंतर वडिलांची आठवण म्हणून मयंक अगरवालसोबत मिळून एक विशिष्ट सेलिब्रेशन केले होते. त्यानंतर संपूर्ण दौऱ्यावर ज्यावेळी सिराजने फलंदाजांना बाद केले त्यावेळी मयंकसोबत अशा प्रकारचे सेलिब्रेशन केले.
महत्त्वाच्या बातम्या –
बुमराह नव्हे आयपीएलचे ‘हे’ सितारेही मागील वर्षात अडकलेत लग्नबंधनात, एक तर बनलाय बाबा
Video: ‘कुणाला तरी राग येतोय’ म्हणत पंतने काढली खोड, रागाच्या भरात पठ्ठ्या सरळ झेलबाद
अँडरसन तुला मानलं ! गिलला बाद करत ‘या’ विश्वविक्रमाच्या यादीत पटकावलं अव्वलस्थान