भारतीय क्रिकेट संघ या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. यंदा प्रतिष्ठित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियात खेळली जाणार असून यावेळी मालिकेत चार ऐवजी पाच कसोटी सामने होणार आहेत.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथनं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारताच्या कसोटी संघात वेगवान गोलंदाज मयंक यादवचा समावेश करावा, अशी इच्छा व्यक्ती केली आहे. तो मयंकच्या आयपीएल 2024 मधील आतापर्यंतच्या कामगिरीनं खूप प्रभावित झाला आहे. स्मिथ आयपीएल 2024 मधील कोणत्याही संघाचा भाग नाही. तो स्पर्धेत समालोचन करतोय.
मयंक यादवनं आरसीबीविरुद्ध 20 षटकात केवळ 14 धावा देऊन तीन बळी घेतले. त्यानं रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमेरून ग्रीनला बाद केलं. मयंक सध्या ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय, हे पाहून जगातील अनेक दिग्गज खेळाडू प्रभावित झाले आहेत. यामध्ये स्टीव्ह स्मिथचंही नाव आहे. स्मिथ म्हणाला, “ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये मयंक यादवचा समावेश करावा. मी त्याला सामोरं जाण्यास उत्सुक आहे.”
मयंक यादवनं आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना पहिल्या दोन सामन्यांत आपल्या गोलंदाजीनं कहर केला आहे. त्यानं मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध आयपीएल 2024 मधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा स्वतःचाच विक्रम मोडला. मयंकची खास गोष्ट म्हणजे, वेगासोबतच त्याची लाइन आणि लेन्थ अचूक आहे, जी त्याला अधिक धोकादायक गोलंदाज बनवते.
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध आरसीबी सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात लखनऊनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात, आरसीबीचा संघ पूर्ण 20 षटकंही न खेळता 153 धावांवर ऑलआऊट झाला. याचं बरेचसं श्रेय मयंक यादवला जातं.
मयंकनं आरसीबीविरुद्ध घेतलेल्या तीन विकेटपैकी दोन खेळाडू ऑस्ट्रेलियाचे होते. दुखापतीमुळे तो गेल्या मोसमात खेळू शकला नव्हता, मात्र या मोसमात संधी मिळताच त्यानं आपल्या कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे, मयंक त्याच्या पहिल्याच दोन सामन्यांमध्ये सामनावीर म्हणून निवडला गेला. अशी कामगिरी करणार तो आयपीएलच्या इतिहासातील पहिला खेळाडू आहे. याशिवाय तो पर्पल कॅपच्या शर्यतीतही दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
याच्या गोलंदाजीत हेल्मेटमुळे वाचला अनेकांचा जीव! जाणून घ्या, कसा घडला वेगाचा बादशाह मयंक यादव
आरसीबीविरुद्ध मयंक यादवचा कहर! वाऱ्याच्या वेगानं फेकला IPL 2024 मधील सर्वात वेगवान चेंडू
लखनऊला बसला मोठा धक्का! 6.4 कोटी रुपयांचा स्टार वेगवान गोलंदाज संपूर्ण हंगामातून बाहेर