---Advertisement---

आरसीबीविरुद्ध मयंक यादवचा कहर! वाऱ्याच्या वेगानं फेकला IPL 2024 मधील सर्वात वेगवान चेंडू

---Advertisement---

आयपीएल 2024 च्या 15व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर लखनऊ सुपर जायंट्सचं आव्हान होतं. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात लखनऊचा वेगवान गोलंदाज मयंक यादवनं कहर केला. मयंकच्या आग ओकणाऱ्या चेंडूचं आरसीबीच्या फलंदाजांकडे काहीच उत्तर नव्हतं. मयंकनं बंगळुरूविरुद्ध 4 षटकांत अवघ्या 14 धावा देत 3 बळी घेतले.

मयंकनं आधी घातक ग्लेन मॅक्सवेलला वेगाच्या जाळ्यात अडकवून झेलबाद केलं. त्यानंतर त्यानं मोठ-मोठ्या हीट मारण्यात पटाईत असलेल्या कॅमरून ग्रीनला क्लीन बोल्ड केलं. मयंकच्या चेंडूवर ग्रीन चारी मुंड्या चीत झाला होता. चेंडू किती वेगानं आला, हे त्याला समजलंच नाही. मयंकनं आपल्या अखेरच्या षटकात पुन्हा कमाल केली. त्यानं खेळपट्टीवर जम बसवलेल्या रजत पाटीदारला पडिक्कलच्या हाती झेलबाद केलं.

या सामन्यात मयंक यादवनं मोठा विक्रम केला आहे. त्यानं आरसीबीविरुद्ध चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएल 2024 चा सर्वात वेगवान चेंडू टाकला. मयंकनं कॅमरून ग्रीनला ताशी 156.7 किमी वेगानं चेंडू टाकला, जो आयपीएलच्या या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे. विशेष म्हणजे, मयंकनं आपल्या पदार्पणाच्या सामन्यातही हा विक्रम केला होता. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्यानं ताशी 155.8 किमी वेगानं चेंडू फेकला होता.

 

मयंक यादवनं 30 मार्च रोजी पंजाब किंग्जविरुद्ध पदार्पण केलं होतं. या सामन्यात त्यानं आपल्या वेगानं सर्वांनाच चकित केलं. भारताकडून दीर्घकाळ क्रिकेट खेळणारा पंजाबचा कर्णधार शिखर धवनही त्याचा वेग पाहून आश्चर्यचकित झाला होता. त्याला मयंकचे चेंडू नीट खेळता आले नाहीत. या सामन्यात मयंकनं 4 षटकांत 27 धावा देऊन 3 बळी घेतले होते.

आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या शॉन टेटच्या नावावर आहे. त्यानं 2011 मध्ये 157.71 किमी प्रतितास वेगानं गोलंदाजी केली होती. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्युसन आहे, ज्यानं ताशी 157.3 किमी वेगानं चेंडू फेकला आहे.

आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू

शॉन टेट – ताशी 157.7 किमी
लॉकी फर्ग्युसन – ताशी 157.3 किमी
उमरान मलिक – ताशी 157.0 किमी 
मयंक यादव – ताशी 156.7 किमी 
ॲनरिक नॉर्किया – ताशी 156.2 किमी

महत्त्वाच्या बातम्या-

पराभवानंतर कमालीचा निराश होता हार्दिक पांड्या, चेन्नईच्या माजी खेळाडूने केलं सांत्वन; व्हिडिओ व्हायरल

आता विराट-बाबरच्या टीम येणार आमनेसामने! 10 वर्षांनंतर पुन्हा खेळली जाणार चॅम्पियन्स लीग

धावा समान, मात्र तरीही विराट कोहलीऐवजी रियान परागकडे ऑरेंज कॅप का? जाणून घ्या

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---