---Advertisement---

आता विराट-बाबरच्या टीम येणार आमनेसामने! 10 वर्षांनंतर पुन्हा खेळली जाणार चॅम्पियन्स लीग

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात 2008 मध्ये झाली. पुढच्याच वर्षी चॅम्पियन्स लीग लॉन्च झाली. 2009 मध्ये चॅम्पियन्स लीगचा पहिला हंगाम खेळला गेला, मात्र 2014 मध्ये ही लीग थांबवण्यात आली. आता ही लीग पुन्हा सुरू करण्याच्या चर्चांना वेग आला आहे. भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट बोर्ड यासाठी प्रयत्नशील आहेत.

2014 मध्ये शेवटची चॅम्पियन्स टी-20 लीग आयोजित करण्यात आली होती. चेन्नई सुपर किंग्जनं कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत विजेतेपद पटकावलं होतं. त्या स्पर्धेत भारताचे तीन, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी दोन आणि पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचा प्रत्येकी एक संघ सहभागी झाला होता.

ऑस्ट्रेलियातील क्रिकेट व्हिक्टोरियाचे सीईओ निक कमिन्स यांनी या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र वर्षभरात संघांच्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकामुळे चॅम्पियन्स लीग पुन्हा कधी सुरू होईल, याबाबत काहीही सांगणं तसं कठीण आहे. निक कमिन्स म्हणाले, “मी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकली यांच्याशी चॅम्पियन्स लीगबद्दल सतत बोलत असतो. मला वाटतं की ही लीग परत आणणं महत्त्वाचे आहे. गेल्या वेळी चॅम्पियन्स लीग सुरू झाली तेव्हा टी20 फॉरमॅट फारसा लोकप्रिय नव्हता. मात्र मला माहित आहे की क्रिकेट ऑस्ट्रेलिया, इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय चॅम्पियन्स लीग पुन्हा सुरू करण्याच्या मुद्द्यावर सतत चर्चा करत आहेत.”

चॅम्पियन्स लीग पुन्हा सुरू झाल्यास याचा थेट अर्थ असा होईल की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या आयपीएल संघांना शाहीन आफ्रिदी आणि बाबर आझम यांच्या पीएसएल संघांचा सामना करावा लागेल. मात्र चॅम्पियन्स लीग पुन्हा कधी सुरू होईल, त्याची पात्रता प्रक्रिया काय असेल याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. चॅम्पियन्स लीगमध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज 2-2 वेळा चॅम्पियन बनले आहेत. तर एकदा न्यू साउथ वेल्स आणि एकदा सिडनी सिक्सर्स संघाला ट्रॉफी जिंकण्यात यश आलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

अंपायरच्या चुकीमुळे इंग्लंड चॅम्पियन बनला, 2019 विश्वचषकाच्या फायनलमध्ये झाली होती मोठी चूक, पाच वर्षांनंतर खुलासा

विश्वचषक विजयाला 13 वर्ष पूर्ण! धोनीच्या योद्ध्यांनी आजच्याच दिवशी रचला होता इतिहास

मुंबई इंडियन्सनं आयपीएलमध्ये रचला इतिहास, आजपर्यंत कोणताही संघ हा पराक्रम करू शकला नाही

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---