---Advertisement---

‘तुम्हाला फक्त पंड्या कुटुंबाकडे पहावे लागेल’, हार्दिकने का दिले असे उत्तर, जाणून घ्या

On: मंगळवार, मार्च 23, 2021 7:39 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून (२३) सुरुवात झाली. हे तिन्ही सामने पुण्याजवळील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमसीए स्टेडियमवर खेळविण्यात येतील. या पहिल्या सामन्यात भारतासाठी कृणाल पंड्या व प्रसिद्ध कृष्णा यांनी वनडे पदार्पण केले. मात्र, त्याचवेळी कृणालचा भाऊ आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नाला त्याने मजेदार उत्तर दिले.

तुम्हाला फक्त पंड्या कुटुंबाकडे पहावे लागेल
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या सामन्या पूर्वीचा हार्दिक पंड्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो आभासी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसतोय. या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने भारतीय संघाच्या अष्टपैलू खेळाडूंच्या समस्येविषयी एक प्रश्न विचारला. त्यावर, हार्दिकने गमतीदार उत्तर दिले. हार्दिक म्हणाला, “अष्टपैलूंविषयी काही असेल तर, कदाचित तुम्ही फक्त पंड्या कुटुंबाकडे पहावे.”

हार्दिक आणि कृणाल हे दोघेही अष्टपैलू आहेत. हार्दिक मध्यमगती तर, कृणाल डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करतो. दोघेही अत्यंत आक्रमक फलंदाज आहेत.

वनडे पदार्पणात कृणालची चमकदार कामगिरी
भारतासाठी यापूर्वी १८ टी२० सामने खेळणाऱ्या कृणालने आज आपले वनडे पदार्पण केले. त्याने आपल्या पहिल्याच वनडे सामन्यात तुफानी अर्धशतक झळकावले. त्याने २६ चेंडूत अर्धशतक झळकावून, वनडे पदार्पणात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विश्वविक्रम केला. कृणालने ७ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ३१ चेंडूत नाबाद ५८ धावांची खेळी केली.

भारतीय संघाची मोठी धावसंख्या
पहिल्या वन डे सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ३१७ धावा ठोकल्या. भारतासाठी शिखर धवन व रोहित शर्मा यांनी ६४ धावांची सलामी दिली. त्यानंतर, कर्णधार विराट कोहलीने १०५ धावांची भागीदारी केली. दोघांनी अनुक्रमे ९८ व ५६ धावा ठोकल्या. अखेरीस, केएल राहुल व पदार्पणवीर कृणाल पंड्याने नाबाद अर्धशतके करून भारताचा डाव ३१७ पर्यंत नेला.

महत्त्वाच्या बातम्या –

आठवणीतील सामना: भारतीय संघ १८ वर्षांपूर्वी क्रिकेटमधील सर्वात मोठा सामना झाला होता पराभूत

अर्धशतक झळकवल्यावर पंड्या आणि राहुलचे खास सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ

आनंद महिंद्रा, अक्षर पटेल आणि गॉगल! महिंद्रांच्या ‘त्या’ पोस्टवर पटेलची खास कमेंट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---