---Advertisement---

एमसीएकडून गावसकर आणि वेंगसरकर यांचा मोठा सन्मान; वानखेडे स्टेडियमच्या हॉस्पिटॅलिटी बॉक्स अन् स्टँडला दिग्गजांची नावं

On: शनिवार, ऑक्टोबर 30, 2021 1:57 AM
---Advertisement---

मुंबई क्रिकेट असोसिएशनने शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर आयोजित एका कार्यक्रमात भारताचे दोन महान क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि दिलीप वेंगसरकर यांचा गौरव केला आहे. एमसीएने सुनील गावसकर यांच्या नावाचा हॉस्पिटॅलिटी बॉक्सचे उदघाटन करून त्यांचा सन्मान केला आहे. यावेळी एमसीएने माजी राष्ट्रीय निवड समिती प्रमुख आणि माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांच्या नावाने ‘दिलीप वेंगसरकर स्टँड’चेही उद्घाटन केले आहे.

गावसकर आणि वेंगसरकर हे दोघेही यावेळी उपस्थित होते. भारताचे माजी सलामीवीर आणि गावसकर यांचे मेहुणे गुंडप्पा विश्वनाथ, महान फलंदाज फलंदाज सचिन तेंडुलकर, आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एमसीएचे वरिष्ठ अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

आपल्या भाषणात विश्वनाथ यांनी गावसकर आणि वेंगसरकर यांचे कौतुक केले आणि दोघांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. एमसीएने याप्रसंगी ‘माधव मंत्री शताब्दी वर्ष ‘ देखील सुरू केले आहे. सचिन तेंडुलकरने वानखेडे स्टेडियमवर ‘बॉल बॉय’ असताना १९८७ च्या विश्वचषकात सुनील गावस्कर यांच्याशी झालेली पहिल्या भेटीची आठवण सांगितली.

तो म्हणाला,’ जेव्हा माझी रणजी करंडक स्पर्धेत पहिल्यांदा निवड झाली, तेव्हा गावसकर यांचे नाव यादीत होते आणि मी त्यांच्यासोबत खेळण्यासाठी उत्सुक होतो, पण ते स्वप्न अधुरेच राहिले.’

https://www.youtube.com/watch?v=LGyxnl5w8ZA

सुनील गावसकर यांनी ६ मार्च १९७१ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. भारताचे माजी कर्णधार आणि १२५ कसोटी सामने खेळलेल्या गावसकर यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणाला या वर्षी ५० वर्षे पूर्ण झाली आहेत.

यावेळी सचिनने दिलीप वेंगसरकर यांच्यासोबत घालवलेल्या दिवसांच्या आठवणी देखील सांगितल्या, तो म्हणाला की, दिवंगत वासू परांजपे यांच्यामुळेच मी दिलीप वेंगसरकर यांना पहिल्यांदा भेटलो.’ १९९१ च्या रणजी फायनलमध्ये मुंबईचा पराभव झाल्यानंतर दिलीप वेंगसरकरांच्या डोळ्यात अश्रू आल्याची आठवण सचिनने सांगितली. ‘हा स्टँड त्या अश्रूंचा सन्मान आहे,’ असेही तो म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारीच ना! इंग्लंडच्या सारा टेलरचा ऐतिहासिक निर्णय, अबुधाबी टी१०मध्ये गेल, स्टर्लिंगसारख्या खेळाडूंना देणार प्रशिक्षण

बाबर आझम ‘कर्णधार’ कोहलीवर पडला भारी! टी२० मधील ‘तो’ मोठा विश्वविक्रम केला आपल्या नावे

Video: ‘युनिवर्स बॉस’ने पुन्हा केलं चाहत्यांना निराश; षटकार मारण्याच्या नादात गेल ‘असा’ झाला क्लीन बोल्ड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---