मंगळवारी (दि. 06 जून) महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 हंगामाचा लिलाव पुणे येथे पार पडला. या लिलावात एकूण सहा फ्रँचायझीनी सहभाग घेतला होता. या लिलावाला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या लिलावानंतर रोहित पवार यांनी ट्वीट केले. त्यांचे ट्वीट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, एमएपीएल स्पर्धेत खेळणारे खेळाडू आयपीएल आणि देशाच्या संघातही चमकतील.
रोहित पवारांचे ट्वीट
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बुधवारी (दि. 07 जून) त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून लक्षवेधी ट्वीट केले. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, “एमपीएलमध्ये (महाराष्ट्र प्रीमिअर लीग) सहभागी होणाऱ्या सहा संघातील खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली… संघांच्या लिलावाप्रमाणेच खेळाडूंच्या लिलावालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.. यावेळी ॲपेक्स बॉडीचे सर्व मेंबर उपस्थित होते.”
आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी राज्यातील गुणी खेळाडूंना एक हक्काचं मैदान #MPL मुळं मिळणार असून यातील अनेक खेळाडू भविष्यात #IPL मध्ये तसंच देशाच्या संघातही चमकतील, यात कोणतीही शंका नाही. pic.twitter.com/JcDMk9zqMk
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 7, 2023
‘देशाच्या संघातही चमकतील…’
पुढे त्यांनी खेळाडूंविषयी बोलताना लिहिले की, “आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी राज्यातील गुणी खेळाडूंना एक हक्काचं मैदान एमपीएलमुळं मिळणार असून यातील अनेक खेळाडू भविष्यात आयपीएलमध्ये तसंच देशाच्या संघातही चमकतील, यात कोणतीही शंका नाही.”
#MPL मध्ये (महाराष्ट्र प्रीमिअर लीग) सहभागी होणाऱ्या सहा संघातील खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली… संघांच्या लिलावाप्रमाणेच खेळाडूंच्या लिलावालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.. यावेळी ॲपेक्स बॉडीचे सर्व मेंबर उपस्थित होते. pic.twitter.com/n6AkqjsZKL
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 7, 2023
एमपीएल 2023 लिलावातील सर्वात महागडा खेळाडू
महाराष्ट्राचा अनुभवी फलंदाज नौशाद शेख (Naushad Shaikh) हा या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. केदार जाधव (Kedar Jadhav) कर्णधार असलेल्या कोल्हापूर टस्कर्स (Kolhapur Tuskers) संघाने त्याच्यावर तब्बल सहा लाखांची बोली लावली.
पुणे (Pune) येथे झालेल्या या लिलावात जवळपास सर्वच संघांची नौशाद याच्यावर नजर होती. सुरुवातीला ईगल नाशिक टायटन्स (Eagle Nashik Titans) व पुणेरी बाप्पा (Puneri Bappa) यांनी त्याच्यावर बोली लावली. मात्र, बोली चार लाखांच्या पार गेल्यानंतर अचानकपणे कोल्हापूर स्पर्धेत उतरला.
यावेळी नाशिकने माघार घेतल्याने अखेरपर्यंत कोल्हापूर व पुणे यांच्या दरम्यान त्याला आपल्या संघात घेण्यासाठी जोरदार रस्सीखेच झाली. अखेर सहा लाखांची सर्वात मोठी बोली लावत कोल्हापूर संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. विशेष म्हणजे त्याची बोली 60 हजारांच्या आधारभूत किमतीने सुरू झालेली. याचाच अर्थ त्याला त्याच्या मूळ किमतीच्या 10 पट रक्कम मिळाली. (mca president and mla rohit pawar tweet about mpl players)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
MPL लिलावात रोहित पवारांची मोठी घोषणा, भारतीय क्रिकेटमध्ये प्रथमच घडणार ‘ही’ गोष्ट
MPL AUCTION: पहिल्याच लिलावात ही ‘पंचरत्ने’ झाली मालामाल, वाचा संपूर्ण यादी