---Advertisement---

सचिन, रोहितच्या चौकार षटकारांचा हिशोब ठेवणारा व्यक्ती बनला कोरोना योद्धा

On: मंगळवार, जून 23, 2020 9:34 PM
---Advertisement---

सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या खेळाडूंच्या चौकार षटकारांचा हिशोब ठेवणारे मुंबई क्रिकेट संघाचे ५५ वर्षीय स्कोरर दीपक जोशी सध्याच्या दिवसात कोरोना योध्याची आपली भूमिका व्यवस्थित पार पाडत आहेत.

जोशी(Dipak Joshi) दक्षिण मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये मागील 28 वर्षांपासून मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट या पदावर कार्यरत आहेत आणि सध्या कोविड १९ च्या काळात ते सगळ्या पेशंटचे एक्स-रे काढण्याचे काम करत आहेत. जोशी हे विरारमध्ये राहतात. जो की मुंबईचा उपनगरीय भाग आहे. ते २४ मे पासून कामावर परत आले आहेत.

त्यांनी पीटीआयला सांगितले की ‘२४ मे रोजी तीन बस बदलून आणि तीन तासांहून अधिक प्रवास करुन मी रुग्णालयात पोहोचलो आणि तेव्हापासून मी काम करत आहे. मला दररोज ८ तास काम करावे लागते. त्या दरम्यान मी कोविड-१९ चे १५ ते २० संशयित रुग्ण बघतो. मी त्यांच्या छातीचा एक्स-रे काढतो.’

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत स्कोरर म्हणून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण ३२८सामने स्कोरिंग केलेले जोशी गेल्या एक महिन्यापासून घरी गेले नाहीत.

ते म्हणाले की ‘मी २४ मे नंतर माझ्या घरी गेलो नाही. रुग्णालयाने मला राहण्यासाठी एक जागा उपलब्ध करुन दिली आहे आणि मी तिथेच राहतो. यासाठी हॉटेल व्यवस्थापनाचा मी आभारी आहे. माझी पत्नी आणि मुलींना माझ्या सुरक्षिततेबद्दल काळजी आहे, परंतु तरीही त्यांनी मला काम सुरू ठेवण्यास प्रोत्साहित केले. मी स्वतःचे रक्षण करावे अशी त्यांची इच्छा आहे. त्यांचे सहकार्य माझ्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे.’

मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या कार्याचे कौतुक केल्याबद्दलही त्यांना आनंद आहे. आतापर्यंत ११ कसोटी, २१ एकदिवसीय आणि पाच टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अधिकृत स्कोरर राहिलेले जोशी म्हणाले की ‘मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या काही अधिकाऱ्यांनी माझ्याशी बोलून माझ्या कार्याचे कौतुक केले. यामुळे देखील मला प्रेरणा मिळाली.’

ट्रेंडिंग घडामोडी – 

अशाप्रकारे विराट कोहलीने बदलले जगातील सर्वात वजनदार क्रिकेटपटूचे आयुष्य

पाकिस्तान आणखी मोठा झटका! आता हे ७ क्रिकेटपटूही कोरोना पॉझिटिव्ह

ब्रेकिंग- दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच कोरोना पॉझिटिव्ह

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---