पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत डावखुरा फिरकी गोलंदाज ओमकार मोहिते(5-47 व 4-49)च्या भेदक गोलंदाजीसह अनिकेत नलावडे(96धावा) याने केलेल्या धावांच्या जोरावर एमसीए वेस्ट झोन संघाने युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाचा 9 गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या अंतिम फेरीच्या तीन दिवसीय लढतीत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाच्या आज 9षटकात 2बाद 53धावापासून खेळ सुरू झाला. तत्पूर्वी पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 33.3षटकात 131 धावावर संपुष्टात आला. याच्या उत्तरात एमसीए वेस्ट झोन संघाचा डाव 39.5षटकात 181धावा करून संघाला पहिल्या डावात 50 धावांची आघाडी मिळवली.
दुसऱ्या डावात एमसीए वेस्ट झोनच्या ओमकार मोहिते(4-49), क्षितिज पाटील(3-36), प्रथमेश बाजारी(2-2)यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे युनायटेड स्पोर्ट्स क्लबचा डाव 34.3षटकात सर्वबाद 119धावावर कोसळला. यात प्रद्युम्न महाजनने सर्वाधिक 67 धावा केल्या. विजयासाठी 70 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या एमसीए वेस्ट झोन संघाने हे आव्हान 14.1षटकात 1बाद 72 धावा करून पूर्ण केले. यात वैभव पाटील 25, उसामा पारकर नाबाद 20, ऋषिकेश राऊत नाबाद 19 यांनी धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. सामनावीर ओमकार मोहिते ठरला.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखान्याचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, एमसीएचे अध्यक्ष विकास काकतकर, फिल्ट्रमचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन किर्लोस्कर, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव सारंग लागू व क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, इंद्रजीत कामतेकर, कपिल खरे आदी मान्यवर होते.
निकाल: अंतिम फेरी:
पहिला डाव: युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 33.3षटकात सर्वबाद 131 धावा वि.एमसीए वेस्ट झोन: 39.5षटकात सर्वबाद 181धावा एमसीए वेस्ट झोन संघाकडे पहिल्या डावात 50 धावांची आघाडी;
दुसरा डाव: युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 34.3षटकात सर्वबाद 119धावा(प्रद्युम्न महाजन 67(47,12×4,1×6), रामकृष्ण घोष 13, आनंद ठेंगे 13, ओमकार मोहिते 4-49, क्षितिज पाटील 3-36, प्रथमेश बाजारी 2-2) पराभूत वि.एमसीए वेस्ट झोन: 14.1षटकात 1बाद 72 धावा(वैभव पाटील 25(41,2×4,1×6), उसामा पारकर नाबाद 20(33,2×4,1×6), ऋषिकेश राऊत नाबाद 19(11), ऋतुराज धुळगुडे 1-10);सामनावीर-ओमकार मोहिते; एमसीए वेस्ट झोन संघ 9 गडी राखून विजयी.
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज: सुधाकर भोसले(273धावा);
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: आनंद ठेंगे(22विकेट);
मालिकावीर: कन्हैया लड्डा(19 विकेट);
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक: साहिल औताडे(६कॅच, १स्टम्पिंग).
महत्त्वाच्या बातम्या –
एनइसीसी डेक्कन आयटीएफ २५०००डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
Video: शेवटच्या चेंडूवर ६ धावांची गरज, फलंदाजीसाठी समोर ट्रेंट बोल्ट; मग काय ‘असा’ ठोकला षटकार
रवींद्र जडेजावरही चढला ‘पुष्पा’ चित्रपटाचा फिव्हर; शेअर केलेल्या व्हिडिओवर अल्लू अर्जुनची खास कमेंट