Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वादग्रस्त ‘रनआऊट’ निर्णयाबद्दल MCC गोलंदाजांच्या पाठीशी! म्हणाले, ‘नियमानुसार फलंदाजच दोषी’

February 24, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Deepti-Sharma

Photo Courtesy: Twitter/KedarJakhalekar


क्रिकेटच्या मैदानावर सातत्याने नॉन स्ट्राइकवर केल्या जाणाऱ्या धावबादच्या निर्णयाची चर्चा होत असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून अशा प्रकारे धावबाद करण्याला परवानगी मिळाली असली तरी, अनेकदा ही पद्धत खेळ भावनेच्या विरुद्ध असल्याचे बोलले जाते. मात्र, आता क्रिकेटचे नियमन करणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) यांनी ही पद्धत चुकीची नसून यामध्ये गोलंदाजाचा कोणताही दोष नसल्याचे स्पष्ट केले आहे.

क्रिकेटच्या सामन्यात अनेकदा गोलंदाज चेंडू टाकण्यापूर्वीच नॉन स्ट्राइकवर असलेला फलंदाज क्रिझ बाहेर गेल्यास  त्याला धावबाद करत होता. या पद्धतीला मंकडिंग असे बोलले जात. अशाप्रकारे फलंदाजाला बाद केल्याने अनेकदा वाद झाल्याचे देखील पाहायला मिळाले आहे. यावर तोडगा काढताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ही पद्धत वैध ठरवत त्याला केवळ धावबाद असे म्हणण्यास परवानगी दिली आहे. धावबादच्या या नियमाचा क्रिकेटच्या नियमात देखील समावेश करण्यात आला.

असे असले तरी, अनेकदा यामध्ये गोलंदाजांना दोषी धरून टीका केली जाते. मात्र, आता क्रिकेटचे नियमन करणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्लबने अधिकृत निवेदन जाहीर करत, हा प्रकार वैध असल्याचे म्हटले. एमसीसीने आपल्या निवेदनात लिहिले,

‘नॉन स्ट्राइकवर धावबाद केलेल्या फलंदाजाला बाद केल्यानंतर गोलंदाजाला अपराधी म्हणणे चुकीचे आहे. खेळ भावनेचा दाखला देत तुम्ही गोलंदाजावर टीका करू शकत नाही. हा नियम असल्याने यामध्ये सर्वस्वी फलंदाजाची चुकी आहे. तसेच, फलंदाजाला चेतावणी देण्याची देखील काही गरज नाही. फलंदाजाकडे दोन पर्याय आहेत. त्याने एकतर क्रिझमध्ये उभे राहावे किंवा बाद होण्याची जोखीम पत्करावी.”

हा नियम लागू केल्यानंतर रविचंद्र अश्विन व ऍडम झंपा यांच्यासारख्या अनुभवी गोलंदाजांनी या नियमाचे स्वागत केले होते. मात्र, काही खेळाडूंनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती.

(MCC Confirm Non Strike Run Out Is Legal)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नेमारची गर्लफ्रेंड आजमावणार बॉलीवूडमध्ये नशीब! गिरवतेय हिंदी आणि कथ्थकचे धडे
आनंदाची बातमी! तिसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी ‘हा’ ऑस्ट्रेलियन तयार; म्हणाला, ‘मी 100 टक्के फिट…’


Next Post
Michael Hussey

मायकल हसीकडून भारताच्या 'या' फलंदाजाचे कौतुक, स्वतःच्या संघाला सुनावले खडेबोल

Virat Kohli Sonakashi Sinha

रोहितच्या लग्नात विराटने 'या' बॉलिवूड अभिनेत्रीसोबत धरला होता ठेका, जुना व्हिडिओ तुफान व्हायरल

akmal-gambhir

तब्बल 13 वर्षांनंतर अकमलने केला गंभीरसोबतच्या वादाबाबत खुलासा, म्हणाला...

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143