---Advertisement---

क्रिकेटच्या मैदानावरील वादाला हिंसक वळण, खेळाडूंनी एकमेकांना बॅटने केली मारहाण – Video

psl10 viral video
---Advertisement---

क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंमध्ये सातत्याने वाद होत असतात. क्रिकेटच्या मैदानावरचे दररोज असे अनेक व्हिडिओ समोर येतात, ज्यामध्ये खेळाडूंमध्ये बाचाबाची होत असते. मात्र, कधी-कधी याला हिंसक रूप देखील येते.

नुकताच क्रिकेटच्या मैदानावरचा एक धक्कादायक करणारा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये फलंदाज आणि गोलंदाजाची जोरदार टक्कर होताना दिसतेय. दोघांमध्ये जोरदार मारामारी होत आहे. इतकेच नव्हेतर दोघेही एकमेकांवर बॅटने हल्ला करताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ही संपूर्ण घटना एमसीसी वीकेंड बॅश XIX च्या अंतिम सामन्यातील आहे. एरोविसा क्रिकेट आणि रबदान क्रिकेट क्लब यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या 13 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर नासिर अलीने काशिफ मोहम्मदला पायचित केले. बळी घेतल्यानंतर गोलंदाजाने जोरदार आनंद साजरा केला. अशा स्थितीत काशिफची गोलंदाजाशी भिडत झाली. यामध्ये दोघांची हाणामारी झाली. यामध्ये दोघांनी एकामेकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, बळी घेतल्यानंतर गोलंदाज चांगलाच संतापतो. त्याच्या आक्रमक सेलिब्रेशनने फलंदाज चांगलाच भडकलेला दिसला. काही वेळ शांत राहिल्यानंतर, फलंदाज देखील आपला संयम गमावतो आणि दोघेही एकमेकांशी भांडतात. फलंदाज गोलंदाजाला मारायला सुरु करतो. या दोघांदरम्यान पंच आणि सहकारी खेळाडू हस्तक्षेप करतात. मात्र, तरीही ते ऐकत नाही. दोन्ही खेळाडू कोणाचेही ऐकत नाही आणि एकमेकांवर बॅटने हल्ला करतात.

मागच्या वर्षी बांगलादेशमधील सेलिब्रिटी लीगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर असाच व्हायरल झालेला. अंपायरच्या एका निर्णयानंतर दोन्ही संघांचे खेळाडू आपसात भिडले होते. त्यानंतर ही लीग रद्द करण्यात आली. भारतातही देशांतर्गत क्रिकेटमध्ये अशा हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट अंगावर धावून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

VIDEO: “सगळे झोपले आहेत” खेळाडूंवर चिडला भारतीय कर्णधार
‘या’ कारणांमुळे शुबमन गिल होणार भारताचा पुढील कर्णधार?
भारत विजयापासून 6 विकेट दूर, बांगलादेशला चमत्काराची आवश्यकता; तिसऱ्या दिवसाचा हाल जाणून घ्या 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---