यावर्षीचा टी20 विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात आला होता. या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान या संघात जो सामना खेळवला गेला, त्या सामन्यात प्रेक्षकांची विक्रमी उपस्थिती बघायला मिळाली होती. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड या ठिकाणी खेळला गेला होता. या विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियामध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यांना प्रेक्षकांनी पाठ फिरवली. त्यामुळे मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (एमसीजी)चे व्यवस्थापन बघणाऱ्या एमसीसी आणि विक्टोरियाच्या शासनाने भारत आणि पाकिस्तान या संघांमध्ये कसोटी सामन्याच्या आयोजनासंदर्भात क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी चर्चा केली आहे.
एमसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट फॉक्स यांनी टी20 विश्वचषकादरम्यान खेळवण्यात आलेला भारत आणि पाकिस्तान सामन्याचा थरार अनुभवला होता. या सामन्यात 90 हजारपेक्षा अधिक प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. फॉक्स म्हणाले की त्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी भारत आणि पाकिस्तान या संघामध्ये कसोटी सामना आयोजित करावा याबाबत चर्चा केली आहे. हे सामने जर ऑस्ट्रेलियात खेळवले गेले तर स्टेडियम पुन्हा एकदा गच्च भरलेले दिसतील. यावर बोलताना हेही म्हणाले की क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबद्दल आयसीसीशी विचारणा करावी. जेव्हा तुम्ही जगातील बरेच स्टेडियम सामन्याच्या वेळी रिकामे बघता, त्यावेळी तिथे प्रेक्षकांची गर्दीने खेळाविषयीचे वातावरणात सुधारणा होऊ शकते. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान संघात कसोटी सामना खेळवल्याने प्रेक्षकांचा ओघ पुन्हा स्टेडियमच्या दिशेने वाढू लागेल.
भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये शेवटची कसोटी मालिका 2007मध्ये खेळवली गेली होती. त्यानंतर हे दोनही संघ फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया चषकामध्ये खेळताना दिसले. भारत आणि पाकिस्तान या दोन देशीतील संबंध 2007 नंतर अधिकच बिघडले. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या संघामध्ये द्विपक्षिय मालिका त्यांच्या मैदानावर खेळवली गेली नाही. जर एमसीजीचा हा प्रयत्न यशस्वी झाला तर प्रेक्षकांना पुन्हा भारत आणि पाकिस्तान या संघामधील सामन्याचा थरार अनुभवता येईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जुने इंजिन काढणार! श्रीलंकेविरुद्ध निवडलेल्या संघातून बीसीसीआयचे उद्दिष्ट स्पष्ट, आता नेतृत्व युवा खेळाडूंकडे
सूर्याला न सांगताच बीसीसीआयने खांद्यावर दिली मोठी जबाबदारी! म्हणाला, ‘पप्पांनी मला मोबाईलवरून…’