नवी दिल्ली । सध्या लॉकडाऊनमुळे क्रिकेट पूर्णपणे ठप्प झाले आहे. परंतु भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी पूर्वीप्रमाणे आताही चर्चेचा विषय ठरत आहे. मंगळवारी (२ मे) धोनी आपल्या नव्या व्हिडिओमुळे चर्चेत आहे. कारण त्या व्हिडिओत धोनी ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. धोनीचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
असा दावा केला जात आहे, की कार आणि बाईक्सची आवड असणाऱ्या धोनीने (MS Dhoni) हा ट्रॅक्टर विकत घेतला आहे. धोनीने लॉकडाऊनदरम्यान हा ट्रॅक्टर विकत घेतला असून तो आपल्या फार्म हाऊसमध्ये चालवला आहे.
धोनीचा ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
#Thala Dhoni meets Raja Sir in his newest beast! 😍 #HBDIlayaraja #WhistlePodu pic.twitter.com/dNQv0KnTdP
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) June 2, 2020
धोनीला क्रिकेट व्यतिरिक्त गाडी आणि बाईक्सची आवड असल्याचे म्हटले जाते. मागील वर्षी धोनीने भारतीय सैनिकांची २० वर्षे जुनी गाडी जोंगा विकत घेतली होती. जोंगाची निर्मिती १९९९नंतर बंद झाली होती. ही गाडी जपानी कार कंपनी निसानच्या प्लॅटफॉर्म पी६० वर तयार केली होती. १९९९ मध्ये भारतीय सैन्याने विकत घेणे बंद केले होते आणि त्याजागी दुसऱ्या गाड्यांना प्राधान्य दिले होते. परंतु इतर कोणतीही गाडी जोंगाला टक्कर देण्याइतपत मजबूत नव्हती. ही गाडी धोनीने विकत घेतली. आता धोनीने ट्रॅक्टर विकत घेतला आहे, जे पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत.
यापूर्वीही धोनी ट्रॅक्टर चालवताना दिसला होता. चेन्नईमध्ये २०१८ साली त्याला ट्रॅक्टरवर पाहिले होते. इतकेच नव्हे तर धोनीने भारतीय संघाची बसदेखील चालवली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणने (VVS Laxman ) आपल्या आत्मकथेत खुलासा केला होता, “कसोटी कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या सामन्यात धोनीने नागपूरमध्ये भारतीय संघाची बस चालवली होती. तो सामन्यानंतर संपूर्ण संघाला स्टेडियमपासून हॉटेलपर्यंत घेऊन गेला होता.”
मागील वर्षी जुलै विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात पराभूत झाल्यानंतर धोनीने एकही क्रिकेटचा सामना खेळला नाही. तो आयपीएलमधून पुनरागमन करणार होता. परंतु कोरोना व्हायरसमुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-‘त्या’ एका कारणामुळे बुमराहला लोकं रोज देतात सल्ला, पण तो काही कुणाच ऐकत नाही
-पाकिस्तानचा असा कर्णधार, ज्याचे आजोबा युपीतून झाले होते ग्रामपंचायत सदस्य
-वनडेत ९९ धावांवर बाद होणारे ५ भारतीय क्रिकेटर, एक राहिला होता ९९वर नाबाद