---Advertisement---

“हा खेळ शरिया कायद्याच्या विरोधात!”, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारची क्रिकेटवर बंदी?

On: शुक्रवार, सप्टेंबर 13, 2024 12:35 PM
Afghanistan
---Advertisement---

गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटच्या लोकप्रियतेत झपाट्यानं वाढ होत आहे. क्रिकेटमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते आहे. दरम्यान, अफगाणिस्तानातील क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. वास्तविक, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारनं देशात क्रिकेटवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे.

अफगाणिस्तानात 2021 मध्ये तालिबानचं शासन आलं. तेव्हापासून या सरकारनं महिलांवर अनेक प्रकारची निर्बंध घातली. आता बोललं जात आहे की, तालिबानच्या नेत्यांनी देशभरात क्रिकेटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही.

मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे की, तालिबानला वाटतं देशात क्रिकेटमुळे चुकीचं वातावरण तयार होतं आणि हा खेळ शरिया कायद्याच्या विरोधात आहे. महत्त्वाचं म्हणजे, गेल्या काही वर्षांपासून अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमनं जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. या संघाची गणना आता जगातील प्रमुख क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये केली जातीये.

 

अफगाणिस्तानच्या संघानं 2023 एकदिवसीय विश्वचषकात शानदार कामगिरी केली होती. संघानं स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंडला पराभवाची धूळ चारली होती. त्यानंतर 2024 टी20 विश्वचषकात अफगाणिस्ताननं ऐतिहासिक कामगिरी केली. संघानं आधी पाकिस्तान आणि नंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव करून सेमीफायनलमध्ये धडक मारली होती. संघाच्या या कामगिरीचं खूप कौतुक झालं होतं.

अफगाणिस्ताननं क्रिकेटला राशिद खान आणि मोहम्मद नबीसारखे मोठे खेळाडू दिले आहेत. हे खेळाडू जगभरातील विविध क्रिकेट लीगमध्ये खेळतात. आयपीएलमध्ये देखील यांची भरपूर डिमांड आहे. गेल्या काही वर्षांत अफगाणिस्तानातून मुजीब उर रहमान, नवीन उल हक यांसारखे युवा खेळाडू देखील समोर आले, ज्यांनी आपल्या कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. मात्र आता क्रिकेटवर बंदी घातली गेली, तर अफगाणिस्तानातील क्रिकेटचं भविष्य काय? असे प्रश्न उभे राहू लागले आहेत.

हेही वाचा – 

ऋतुराज गायकवाड की संजू सॅमसन कोण जास्त दुर्दैवी? भारतीय फिरकीपटूने दिली मोठी प्रतिक्रिया
बांग्लादेश कसोटी सामन्यापूर्वी ‘रोहित-विराट’ चेन्नईला पोहोचले; पाहा VIDEO
91 वर्षात पहिल्यांदाच, अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटी सामना एकही चेंडू टाकल्याशिवाय रद्द!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---