---Advertisement---

क्वारंटाईनमध्ये वेळ घालवण्यासाठी चेतेश्वर पुजाराला मिळाली सर्वात ‘क्यूट’ गेमिंग पार्टनर, पाहा फोटो

On: मंगळवार, मे 25, 2021 11:56 PM
---Advertisement---

भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याची ओळख भारतीय संघाची ‘नवी भिंत’ अशी आहे. आगामी काळात न्युझीलंड विरुद्ध होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुजारा समोर उत्तम कामगिरी करण्याचे आव्हान असणार आहे. मात्र, सध्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी मुंबईत क्‍वारंटाइन असलेला पुजारा कुटुंबासोबत काही आनंदाचे क्षण घालवत आहे. पुजाराने नुकताच सोशल मीडियात एक फोटो शेयर केला असून हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पुजाराने इंस्टाग्राम स्टोरीवर आपल्या मुली सोबत व्हिडिओ गेम खेळतानाचा फोटो शेअर केला होता. तसेच या फोटोवर लिहिले होते की “क्‍वारंटाइन काळातील माझी गेमिंग पार्टनर.” या फोटोमध्ये स्पष्टपणे जाणवते आहे की पुजारा आपल्या मुलीसोबत वेळ घालवत असल्याने फार आनंदी आहे.

विशेष म्हणजे या फोटोत पुजाराची मुलगी आदितीने चेन्नई सुपर किंग्ज संघाची जर्सी घातलेली आहे. पुजाराचा आपल्या मुलीसोबतचा हा गोड फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. हाच फोटो चेन्नई सुपर किंग्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरही शेअर केला आहे.

दरम्यान, पुजारा व एकूणच भारतीय संघासाठी पुढील काही महिने अतिशय महत्त्वाचे असणार आहे. भारतीय संघ आगामी काळात इंग्लंडचा बहुप्रतिक्षित दौरा करणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यात 18 ते 22 जून दरम्यान न्युझीलंड विरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. यानंतर ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची बहुप्रतिक्षित मालिका खेळणार आहे.

भारतीय संघ सध्या शानदार फॉर्ममध्ये असून अनेक क्रिकेट पंडितांच्या मते जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा व इंग्लंड विरुद्ध मालिका विजय मिळवण्याची भारतीय संघाकडे ही सर्वात मोठी संधी आहे.

या संपूर्ण दौऱ्यात पुजराच्या खांद्यावर भारतीय संघाची मोठी भिस्त असणार असून सर्व भारतीय क्रिकेट प्रेमींना आशा असेल की पुजारा शानदार कामगिरी करत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून देईल.

महत्त्वाच्या बातम्या –

जेव्हा विराट कोहलीने सांगितले होते, ‘जडेजा आहे सर्वात खोटारडा व्यक्ती’; जुना व्हिडिओ होतोय व्हायरल

अन् कपड्यानिशी शॉवर घ्यायला गेला रसल, तीन वर्षापूर्वीच्या ‘त्या’ घटनेचा केला उलगडा

बायको ती बायकोच! ‘या’ खेळाडूच्या पत्नीने चेहरा पाहून ओळखले तो आहे कोरोनाबाधित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---