आशिया चषक २०२२ ची सुरुवात होण्यासाठी अवघे २ दिवस बाकी आहेत. तत्पूर्वी सर्व संघ आशिया चषकासाठी संयुक्त अरब अमिरातीला (युएई) पोहोचले आहेत. आशिया चषकातील सर्वात यशस्वी संघ, भारतीय संघही युएईत दाखल झाला आहे. २८ ऑगस्टला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने भारतीय संघ त्यांच्या आशिया चषक मोहिमेची सुरुवात करणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी खराब फॉर्मशी झुंज देत असलेल्या विराट कोहली याचा युएईतील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
विराट (Virat Kohli) गेल्या ३ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक करू शकलेला नाही. ‘रनमशीन’ विराट सध्या धावा करण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. अशात आशिया चषकातून (Asia Cup 2022) जुन्या रंगात परतण्याची संधी विराटकडे असेल. तसेच तो सध्या भारतीय संघातील सर्वात अनुभवी क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्यामुळे त्याच्याकडून संघाला भरपूर अपेक्षा असतील.
अशात खराब फॉर्मचा सामना करत असलेला विराट आशिया चषकापूर्वी दुबईत पाकिस्तानचे फलंदाजी प्रशिक्षक (Pakistan Batting Coach) मोहम्मद युसूफ (Mohammad Yousuf) यांच्याशी भेटला आहे. त्याचे युसूफ यांच्यासोबत बोलतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. विराट आणि युसूफ यांचे फोटो पुढे आल्यानंतर तो पुन्हा लयीत परतण्यासाठी पाकिस्तानी दिग्गजाकडून सल्ले घेत असल्याचे म्हटले जात आहे. कारण युसूफ त्यांच्या काळात पाकिस्तान संघाच्या फलंदाजी फळीचा महत्त्वपूर्ण भाग होते.
विराटची युसूफ यांच्याशी मुलाखत तेव्हा झाली, जेव्हा पाकिस्तानचा संघ त्यांचे सराव सत्र संपवून परतत होता आणि भारतीय संघ त्यांचे सराव सत्र सुरू करणार होता. या काही मिनिटांच्या मुलाखतीत विराटने युसूफकडून फलंदाजीबद्दल काही टिप्स घेतल्या असतील.
विराट आणि आझमचीही मुलाखत
तत्पूर्वी सराव सत्रात (Net Session) विराटने आझमची भेट घेतली. विराटचा हा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत दिसते की, भारतीय संघ सराव सत्रासाठी दुबई स्टेडियममध्ये जात आहे. यादरम्यान पुढून पाकिस्तानचा संघही सरावासाठी येतो. आझम दिसताच विराट थांबून त्याची भेट घेतो. त्याच्याशी हातमिळवणी करतो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. आझमव्यतिरिक्त विराटने अफगाणिस्तानच्या खेळाडूंचीही भेट घेतली. तो अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानशी भेटताना कॅमेऱ्यात कैद झाला.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
शुबमन गिलने स्वत: नाकारली टीम इंडियाची कॅप्टन्सी! मोठं कारण आलं समोर
पाकिस्तानविरुद्ध खेळायला उतरताच कोहली रचणार विश्वविक्रम! ठरणार ‘असा’ कारनामा करणारा पहिलाच भारतीय
पाकिस्तानने आशिया चषकासाठी निवडले दोन ‘छुपे रुस्तम’, भारतासाठी ठरत आहेत धोक्याची घंटा!