ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची ऍशेस मालिका पार पडली होती. ही मालिका ऑस्ट्रेलिया संघाने ४-० ने आपल्या नावावर केली होती. ही मालिका झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया महिला आणि इंग्लंड महिला संघांमध्ये (Aus W Eng W) देखील ऍशेस मालिकेतील एकमात्र कसोटी सामना पार पडला. हा सामना अनिर्णीत राहिला होता. दरम्यान, या सामन्यात पावसाने अडथळा निर्माण केल्यानंतर असा काही प्रकार घडला होता. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, ऑस्ट्रेलिया महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील एकमात्र कसोटी सामना कॅनबेरामध्ये पार पडला. या सामन्यात पावसाचे आगमन झाले होते. ज्यामुळे सामना थांबवण्यात आला होता. सामना थांबल्यामुळे चाहते देखील निराश झाले होते. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी काही महिला प्रेक्षक स्टँड्समध्ये बॉटलच्या साहाय्याने क्रिकेट खेळताना दिसून आले होते. हे पाहून समालोचन करत असलेली माजी महिला क्रिकेटपटू मेल जोन्स (Mel Jones) स्टँड्समध्ये पोहोचली.
लहान मुलांच्या हातात टेनिस बॉल आणि बॅट म्हणून त्यांनी बॉटलचा वापर केला होता. हे मेल जोन्सला पाहावले नाही. ती कोकोबुराची नवी कोरी बॅट घेऊन गेली त्यांच्या हातात दिली. हे पाहून ते लहान मुलं आणि महिला प्रेक्षक भरपूर खुश झाले होते. त्यानंतर मेल जोन्स देखील त्यांच्यासोबत क्रिकेट खेळताना दिसून आली होती. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
What a beautiful moment 😍 @meljones_33 gifting a brand new @KookaburraCkt bat to these kids using a bottle during the rain delay 👏
#WomensAshes pic.twitter.com/Esz5mO068a
— Fox Cricket (@FoxCricket) January 29, 2022
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलिया संघाने या सामन्यातील पहिला डाव ९ बाद ३३७ धावांवर घोषित केला होता. ज्यामध्ये रशेल हेन्सने ८६ तर लेनिंगने ९३ धावांची खेळी केली होती. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाला पहिल्या डावात २९७ धावा करण्यात यश आले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया संघाला २१६ धावा करण्यात यश आले होते. इंग्लंड संघाला हा सामना जिंकण्यासाठी २५७ धावांची आवश्यकता होती. परंतु इंग्लंड संघाला या सामन्यात अवघ्या ९ बाद २४५ धावा करता आल्या.
महत्वाच्या बातम्या:
वयाच्या ४१ व्या वर्षी केविन पीटरसनची मन जिंकणारी फिल्डींग पाहिली का? बघा व्हिडिओ
हे नक्की पाहा :