बिग बॅश लीगमध्ये (BBL) सहभाग घेणारा पहिला भारतीय ठरलेला उन्मुक्त चंद (unmukt chand) उद्या या स्पर्धेतील त्याचे पदार्पण करणार आहे. मेलबर्न रेनेगेड्स (melbourne renegades) संघाने सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयी माहिती दिली. संघाने पोस्टमध्ये उद्याच्या सामन्यासाठी निवडल्या गेलेल्या ११ खेळाडूंची यादी जाहीर केली, ज्यामध्ये उन्मुक्त चंद देखील आहे.
उद्याचा सामना होबार्ट हरीकेन्स आणि आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी मेलबर्न संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये चार महत्वाचे बदल केले आहेत, त्यापैकी एक म्हणजे चंदला संघात स्थान दिले गेले आहे.
4️⃣ changes to our squad for our clash against the @HurricanesBBL, Unmukt's in and Finchy's taking the reins 💪
Full details ➡️ https://t.co/SRHWACPIU9#GETONRED pic.twitter.com/LxZMqg1Xit
— Melbourne Renegades (@RenegadesBBL) January 17, 2022
उन्मुक्त चंद भारताच्या १९ वर्षाखालील संघाचा माजी कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वात भारताने १९ वर्षाखालील विश्वचषकाचे जेतेपद जिंकले होते. चंदने मागच्या काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. स्वतःची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द घडवण्यासाठी अमेरिकेत स्थायिक झाला. यादरम्यान त्याने बिग बॅस लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्स संघासोबत करार केला. त्याला आतापर्यंत संपूर्ण हंगामात संघासाठी खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याने यासंदर्भात एक मजेशीर पोस्ट देखील शेअर केली होती. ट्वीटर पोस्टमध्ये त्याने लिहिले होते की, “सुट्टीवर आल्यासारखे जास्त वाटले. धन्यवाद मेलबर्न.”
ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या २०१२ मधील १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत उन्मुक्तने भारताचे नेतृत्व केले आणि संघाला विजेतेपद देखील मिळवून दिले. परंतु त्यानंतर त्याला आयपीएलमध्ये अपेक्षित संधी मिळाली नाही आणि याच कारणास्तव त्याने अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. जेव्हा त्याने बीबीएल मधील संघासोबत करार केला, तेव्हा इतिहास देखील घडला. तो बीबीएलमध्ये खेळणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. अशात आता त्याले मेलबर्न रेनेगेड्स संघाने पदार्पणाची संधी देखील दिली आहे.
अमेरिकेत चंदने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात मायनर लीगमधून केली. मायनर लीगमध्ये तो सिलिकॉन वॅली संघासाठी खेळला आणि संघाला विजेतेपद देखील मिळवून दिले. त्याच्या एकंदरित कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने २०१० मध्ये पदार्पण केल्यानंतर ७७ टी२० सामने खेळले. यामध्ये २२.३५ च्या सरासरीने आणि ११६.०९ च्या स्ट्राइक रेटने १५६६ धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
‘भावी कर्णधार’ म्हणून राहुलची होतेय चर्चा; मात्र, आकडे पाहून व्हाल निराश; वाचा सविस्तर
“हा विराटने बनविलेला संघ, त्यामुळे…” विश्वविजेत्या खेळाडूची रोचक प्रतिक्रिया
बुमराहने आणला कर्णधारपद प्रकरणात जबरदस्त ट्विस्ट; नेतृत्व करण्याची व्यक्त केली इच्छा
व्हिडिओ पाहा –