---Advertisement---

Video: पाकिस्तानी गोलंदाजाच्या घातक यॉर्करपुढे लागला नाही विस्फोटक मॅक्सवेलचा टिकाव, जोरात फिरवली बॅट अन्…

Glenn-Maxwell-And-Zaman-Khan
---Advertisement---

Zaman Khan Bold Glenn Maxwell, BBL 2023: बिग बॅश लीग 2023-24 स्पर्धेतील 12व्या सामन्यात मेलबर्न स्टार्स विरुद्ध सिडनी थंडर आमने-सामने होते. हा सामना सिडनी थंडरने 5 विकेट्सने जिंकला. या सामन्याचा शिल्पकार जमान खान ठरला. त्याने आपल्या घातक वेगवान गोलंदाजीने मेलबर्नचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेल याला खतरनाक यॉर्कर टाकून क्लीन बोल्ड केले, जो मॅक्सवेलला खेळताच आला नाही. आता यादरम्यानचा व्हिडिओ प्रेक्षकांच्या भुवया उंचावत आहे.

मॅक्सवेलच्या संघाचा पराभव
या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याच्या नेतृत्वातील मेलबर्न स्टार्स (Melbourne Stars) संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी निर्धारित 20 षटकात 10 विकेट्स गमावत 172 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सिडनी सिक्सर (Sydney Sixer) संघाने 18.2 षटकात 5 विकेट्स गमावत 176 धावा करत सामना खिशात घातला.

मेलबर्न स्टार्सने पॉवरप्लेमध्ये दोन विकेट्स गमावल्या होत्या, ज्यानंतर कर्णधार ग्लेन मॅक्सवेल याने डाव सावरला. तो 25 चेंडूत 30 धावांवर चांगल्या लयीत दिसत होता. मात्र, 13व्या षटकात जमान खान (Zaman Khan) याने त्याला आपल्या भेदक यॉर्कर चेंडूने चकवले. तसेच, तंबूचा रस्ता पकडण्यासाठी भाग पाडले. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर मेलबर्न संघ 46 चेंडूत आणखी 73 धावाच जोडू शकला.

 

View this post on Instagram

 

A post shared by KFC Big Bash League (@bbl)

मॅक्सवेलचा त्रिफळा
जमानने 13व्या षटकातील दुसरा चेंडू स्टम्पवर टाकला होता, जो मॅक्सवेल जोरात मारून ऑफ साईडला खेळू इच्छित होता. मात्र, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही आणि तो त्रिफळाचीत बाद झाला. मॅक्सवेलची विकेट घेतल्यानंतर जमानचा आनंद पाहण्यासारखा होता. कारण, मॅक्सवेल टिकला असता, तर तो मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला असता.

जमानने हिल्टन कार्टराईट आणि जोनाथन मेरलो यांनाही तंबूत धाडले. जमानने या सामन्यात 4 षटकात 24 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या. यासह त्याने आपल्या 79व्या सामन्यातच टी20 क्रिकेटमध्ये 100  विकेट्सही पूर्ण केल्या. (melbourne stars vs sydney thunder zaman khan cleans up glenn maxwell with a deadly yorker see video here)

हेही वाचा-
दीप्ती-पूजाच्या नावावर मोठा विक्रम, फिनिशर म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली खेळी नेहमी उल्लेखली जाणार
Video । शॉट असा मारा की, बॉल शोधायला प्रेक्षक गेले पाहिजेत, BBLमध्ये डी कॉकचा राडा; पाहा गगनचुंबी Six

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---