क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडूंच्या प्रदर्शनाबरोबरच स्टेडियमधील काही रंजक दृश्येही कॅमेरात टिपली जातात. सामना दर्शकांनाही अशा गोष्टी पाहण्यात मोठा रस असतो. एखाद्या क्रिकेटपटूच्या प्रदर्शनानंतर त्याची पत्नीने दिलेली प्रतिक्रिया, काव्या मारनसारख्या मिस्ट्री गर्ल आणि अजून काय काय. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात शनिवारी (०२ एप्रिल) पुणे येथे झालेल्या सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले. या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित एक कपल एकमेकांना किस करताना दिसले.
गुजरातच्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या डावादरम्यान (GT vs DC) हा प्रसंग घडला. दिल्लीचा संघ ४ षटकांनंतर ३२ धावा १ बाद अशा स्थितीत होता. यादरम्यान कॅमेरामनने स्टेडियममधील प्रेक्षकांवर कॅमेरा फिरवला आणि हा फार दुर्मिळ पाहायला मिळणारा प्रसंग कॅमेरात कैद केला.
स्टँड्समध्ये बसलेली एक जोडी कॅमेरावर एकमेकांना किस करताना (Couple Kissing In IPL Match) दिसली. यावेळी त्यांच्या बाजूला बसलेल्या काकू त्यांच्याकडे पाठ फिरवून बसलेल्याही दिसल्या. या प्रसंगाचे फोटो वाऱ्यासारखे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांनी त्यावर एकाहून एक जबरदस्त मीम्सही बनवले आहेत.
https://twitter.com/Kumarpintu12171/status/1510311944997142528?s=20&t=PxC4XoXHK6QyTWMsNocneQ
https://twitter.com/DhananjayHans/status/1510324053923426305?s=20&t=oJ4Ag79-8hWjFobVwSzb4w
https://twitter.com/Kourageous7/status/1510330563537866756?s=20&t=AOssYE0gK-zkxjv94ROgaw
https://twitter.com/why_ruhaan_why/status/1510455403486023680?s=20&t=RxNSBoqIEAKqMupHgeArKA
https://twitter.com/thisisbhumika/status/1510448801508519940?s=20&t=80dztrguYJuEboITVZAFjw
https://twitter.com/theprayagtiwari/status/1510308123977809921?s=20&t=B0RYIe8562GydAfi8PUuWA
https://twitter.com/ca_whotravels/status/1510331329870647300?s=20&t=S8ZUvJgub-sIPo0zsx-uZw
https://twitter.com/Odinkabaap/status/1510341432048959488?s=20&t=v9IG9yjvFc1Cft7qOkv96g
https://twitter.com/ptprayagsharma/status/1510329542971621376?s=20&t=vYVnhlkXQoD0kknWhZVbHg
https://twitter.com/Harvyinspector/status/1510310567990415363?s=20&t=3GZHaJlcN3L0yM6uJIzNrg
पहिल्याच सामन्यात मिस्ट्री गर्ल झाली होती व्हायरल
यापूर्वीही चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात झालेल्या आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील पहिल्या सामन्यातही कॅमेरामनमुळे एक मिस्ट्री गर्ल चर्चेत आली होती. सीएसकेचा संघ प्रथम फलंदाजी करताना ४ बाद ५२ धावा अशा स्थितीत होता. संघाची दयनीय स्थिती पाहून सामना पाहायला आलेली एक मुलगी खूप हताश झाल्याची दिसत होती. याचवेळी कॅमेरामनने तिच्यावर कॅमेरा फिरवला आणि तिची रिऍक्शन कॅमेरात कैद केली. यानंतर त्या सौंदर्याची खाण असलेल्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात (Mystery Girl) व्हायरल झाले होते.
गुजरातचा विक्रमी विजय
दरम्यान दिल्ली विरुद्ध गुजरात सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ६ बाद १७१ धावा केल्या होत्या. यामध्ये शुबमन गिलच्या सर्वाधिक ८४ धावांचा समावेश होता. प्रत्युत्तरात दिल्लीच्या संघाला २० षटकांमध्ये १५७ धावाच करता आल्या आणि दिल्लीने १४ धावांनी हा सामना गमावला. अशाप्रकारे नवख्या गुजरात संघाने हंगामातील त्यांचे सलग २ सामने जिंकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL2022| चेन्नई वि. पंजाब सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!






