पुणे। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील २३ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम येथे पार पडलेल्या या सामन्यात अखेरच्या षटकात पंजाब किंग्सने १२ धावांनी विजय मिळवला. पंजाबचा हा हंगामातील तिसरा विजय ठरला मात्र, मुंबईचा सलग पाचवा पराभव ठरला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत असून मीम्सही व्हायरल होत आहेत.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे, त्यांनी ५ वेळा या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. मात्र, आयपीएलच्या १५ व्या हंगामात (IPL 2022) हा संघ संघर्ष करताना दिसून येत आहे. त्याचमुळे त्यावर प्रतिक्रिया उमटत आहे. मुंबईने या सामन्यात अखेरपर्यंत विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. पण अखेरच्या षटकात ओडीयन स्मिथने शानदार गोलंदाजी करत मुंबईला विजयापासून रोखले. त्यामुळे सध्या मुंबईकडे या हंगामात एकही गुण नसून ते गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर आहेत.
सोशल मीडियावर मीम्स व्हायरल
मुंबईचा सलग पाचवा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस (Memes Viral) पडत आहे. एका युझरने एक मीम शेअर केले आहे, ज्यावर लिहिले आहे की, ‘आता तर आम्हाला सवय झाली आहे.’ तसेच एका युजरने आकाश अंबानी यांचा फोटो शेअर करत लिहिले की, ‘जर पैशाने तुम्हाला आनंद विकत घेता शकत नाही, यासाठी कोणता चेहरा असता तर’, असे लिहिले आहे. याशिवाय देखील अनेक मजेशीर मीम्स व्हायरल झाले आहेत.
MI Fans in this IPL#MIvsPBKS pic.twitter.com/OYs2QO915O
— Manoj Pareek (@mrpareekji) April 13, 2022
If money can't buy happiness had a face :#MIvPBKS pic.twitter.com/ALjyhKcqU8
— i M e e r (@Meer079) April 13, 2022
#MIvPBKS #Mumbaiindians lost despite Odean Smith bowling the last over 🥺😂 pic.twitter.com/n4BJt8GMsy
— . (@trippymaymay_) April 13, 2022
https://twitter.com/PatilVishwajit_/status/1514305712914333696
Jofra Archer after seeing Mumbai lose all their first 5 games #IPL2022#IPL#MumbaiIndians #MIvPBKS pic.twitter.com/qSNPsqNf5V
— Arnav Singh (@Arnavv43) April 13, 2022
When you hear as a CSK fan that MI lost again: #MIvPBKS pic.twitter.com/jcoDigG6wD
— Prince Pandey (@princepandey_) April 13, 2022
https://twitter.com/IamKush02/status/1514300648149643264
#MIvPBKS
please 😭 pic.twitter.com/TUMIGXomkS— nipun mahajan (@NiPuN_045) April 13, 2022
— Gagan🇮🇳 (@1no_aalsi_) April 13, 2022
AB de Villiers watching Dewald Brevis today : #MIvPBKS pic.twitter.com/5QePO0mjJ4
— Manoj Pareek (@mrpareekji) April 13, 2022
Baby AB to Rahul Chahar :#MIvsPBKS pic.twitter.com/1wpoUHN416
— Manoj Pareek (@mrpareekji) April 13, 2022
Rohit – bhai same aise hi ab hamko pelta tha pic.twitter.com/h4ffXLqyFN
— Arav (@AravOne8) April 13, 2022
#MIvPBKS
Baby AB 🔥🔥 pic.twitter.com/CSF6svm8dj— Er.__noor (@HumoroussAf) April 13, 2022
Mumbai Indians without good Players is RCB
& RCB with Good Players is Still RCB😹 #IPL #MIvsPBKS #PBKSvsMI #RohitSharma𓃵 pic.twitter.com/bcjkNGxatc— Psycotroller (@Psychotroller) April 13, 2022
Rohit to Brawis – bhai ijjat bchale Vese ek bat bta maar kese rha he be tu 😂#MIvsPBKS#ChampionsLeague#MumbaiIndians pic.twitter.com/ReZzYzUhJm
— THE REAL GOAT 𓃵🇮🇳 (@MAbulkhair02) April 13, 2022
https://twitter.com/MohdAdi33142743/status/1514378720416477186
#MIvPBKS
Smith right now. 😂 pic.twitter.com/YwMW5gL552— S (@Siddhar44496240) April 13, 2022
मुंबईचा पाचवा पराभव
बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, पंजाबच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत त्यांचा हा निर्णय प्रथमत: चूकीचा ठरवला. पंजाबकडून मयंक अगरवाल आणि शिखर धवन या सलामीवीरांच्या जोडीने ९७ धावांची भागीदारी केली. मयंक ३२ चेंडूत ५२ धावा करून बाद झाला, तसेच शिखरने ५० चेंडूत ७० धावांची खेळी केली. त्याचबरोबर जितेश शर्माने १५ चेंडूत ३० धावांची खेळी केली. त्यामुळे पंजाबला २० षटकांत ५ बाद १९८ धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सकडून बासिल थम्पीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या (MI vs PBKS).
त्यानंतर १९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सकडून युवा डेवाल्ड ब्रेविसने २५ चेंडूत ४९ धावांची आणि सूर्यकुमारने ३० चेंडूत ४३ धावांची खेळी केली. तसेच तिलक वर्माने २० चेंडूत ३६ धावा केल्या. मात्र, अन्य कोणाला मोठे योगदान देता आले नाही. त्यामुळे मुंबईला २० षटकांत ९ बाद १८६ धावाच करता आल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022| केव्हा आणि कुठे पाहाल राजस्थान वि. गुजरात सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
IPL2022| राजस्थान वि. गुजरात सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!