---Advertisement---

‘मी काय करू मग? सोडून टाकू सगळं?’, केएल राहुलला दुसऱ्या कसोटीत संधी न दिल्याने मिम्स व्हायरल 

On: शुक्रवार, डिसेंबर 25, 2020 3:33 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. शनिवारपासून (२६ डिसेंबर) हा ऐतिहासिक सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. तत्पुर्वी भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवाचे दु:ख पचवून येत्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत विजय मिळवण्यासाठी झगडत आहे. त्या अनुषंगाने भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही महत्त्वपुर्व बदल करण्यात आले आहे.

‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यासाठी घोषित करण्यात आलेल्या भारतीय संघाच्या अंतिम ११ जणांच्या पथकात सर्वाधिक चर्चेत असलेल्या केएल राहुलला संधी देण्यात आलेली नाही. युवा फलंदाज पृथ्वी शॉच्या खराब फॉर्ममुळे राहुलला ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत सलामीवीर फलंदाजाच्या रुपात संधी मिळेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. परंतु भारतीय संघ व्यवस्थापनाने राहुलचा अंतिम ११ जणांच्या पथकात समावेश केला नसल्यामुळे चाहते नाराज झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल होत आहेत.

एका चाहत्याने, स्टँड अप कॉमेडियनचा फोटो टाकत ‘मी काय करू मग? सगळ सोडून टाकू?,’ असे मिम शेअर केले आहे. तसेच एका चाहत्याने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर यांचा चित्रपटातील एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोवर ‘जलता है मुझसे,’ असे कॅप्शन दिले आहे.

https://twitter.com/srcasticc_suraj/status/1342379327472553984?s=20

https://twitter.com/GuptaSaurabh11/status/1342373411436171264?s=20

https://twitter.com/NeelanshMishra7/status/1342362641834987521?s=20

सिराज-गिलचे पदार्पण

असे असले तरी, शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज यांची ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यासाठी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण होणार आहे. तसेच वृद्धिमान साहाच्या जागी रिषभ पंतला संधी देण्यात आली आहे. सोबतच पहिल्या सामन्यात खेळलेला पृथ्वी शॉ याला अंतिम ११ मधील स्थान गमवावे लागले आहे. याबरोबरच संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्त्व करणार आहे.

असा आहे ११ जणांचा भारतीय संघ – 

अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, शुभमन गिल, रिषभ पंत, मोहम्मद सिराज

महत्त्वाच्या बातम्या-

ब्रेकिंग! बॉक्सिंग डे कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हे’ दोन खेळाडू करणार पदार्पण

“तो काहीही करू शकतो”, बॉक्सिंग डे कसोटीत खेळण्याआधीच पंतचा ऑसी कर्णधाराने घेतला धसका

‘विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे सोन्यासारखी संधी’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---