शारजाह। मंगळवारी (२८ सप्टेंबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात ४१ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. हा सामना कोलकाताने ३ विकेट्सने जिंकला. या सामन्यानंतर दिल्लीचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ त्याच्या एका मजेदार कृतीमुळे चर्चेत आला आहे. त्याच्या एका फोटोवर अनेक विनोदी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स प्रथम फलंदाजीसाठी उतरले. यावेळी स्मिथ शिखर धवनसह सलामीला फलंदाजीसाठी आला. त्याने ३४ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. स्मिथ हा नेहमीत अनोख्याप्रकारे फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. यावेळी त्याने असेच काहीसे केले.
डावाच्या १३ व्या षटकात कोलकाताकडून लॉकी फर्ग्यूसन गोलंदाजी करत होता. त्यानेच स्मिथला या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्रिफळाचीत केले. पण त्यापूर्वी पहिल्या चेंडूवर असे काही झाले की स्मिथच्या फोटोवर मीम्स तयार होत आहेत. झाले असे की फर्ग्यूसनने टाकलेल्या १३ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर स्मिथला स्कूप शॉट खेळायचा होता. पण शॉट हुकला आणि चेंडू त्याच्या मांडीला जोरदार लागला.
त्यामुळे तो मैदानावरच पडला. त्यानंतर काही क्षणांसाठी स्मिथ तसाच मैदानावर झोपून राहिला. याच क्षणाचा फोटो सध्या व्हायरल होत असून सोशल मीडिया वापरकर्ते या फोटोवर गमतीशीर कमेंट्स करत असून मीम्सही शेअर करत आहेत.
Steve Smith looking up at Joe Root in the ICC Test Batting rankings pic.twitter.com/SYWfonrD0J
— England's Barmy Army 🏴🎺 (@TheBarmyArmy) September 28, 2021
DC fans watching Steve Smith bat be like :- pic.twitter.com/Q4CJK8aR7j
— Rahul Sharma (@CricFnatic) September 28, 2021
Steve Smith is so good he just plays the ball lying down now pic.twitter.com/VEeOUv4sCt
— Tom Carpenter (@Carpo34) September 28, 2021
https://twitter.com/_friendlycheema/status/1442858770183434241
Steve Smith looking up at Chennai Super in points table pic.twitter.com/lyg34mXa77
— ` (@WorshipDhoni) September 28, 2021
Steve Smith after IPL till Ashes pic.twitter.com/zIuIi9tMh8
— Q. (@Johannesburg149) September 28, 2021
Steve Smith During #KKRvDC pic.twitter.com/WhxB3b1BuK
— Varad Ralegaonkar (@varadr_tistic) September 28, 2021
https://twitter.com/notfunnyKG/status/1442835495432589323
felt a connection with steve smith today pic.twitter.com/FDf0bEFnDU
— harry (@osvaldo_fan_fan) September 28, 2021
कोलकाताचा विजय
या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १२७ धावाच केल्या. दिल्लीकडून रिषभ पंतने आणि स्टीव्ह स्मिथने प्रत्येकी ३९ धावांची खेळी केली. याशिवाय शिखर धवनने २४ धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा पार करता आला नाही. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यर, सुनील नारायण आणि लॉकी फर्ग्यूसन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच टीम साऊथीने १ विकेट घेतली.
त्यानंतर १२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग कोलकाताने १८.२ षटकांत ७ विकेट्स गमावत पूर्ण केला. कोलकाताकडून नितीश राणाने सर्वाधिक ३६ धावांची नाबाद खेळी केली. तसेच सुनील नारायणने १० चेंडूत आक्रमक २१ धावांची खेळी केली. तर शुबमन गिलने ३० धावा केल्या. दिल्लीकडून अवेश खानने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच एन्रीच नॉर्किए, कागिसो रबाडा, आर अश्विन आणि ललित यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
अश्विनला दोषी ठरवणाऱ्या वॉर्नला भारतीय चाहत्यांनी दाखवला आरसा; करून दिली ‘त्या’ प्रकरणाची आठवण
ग्लेन मॅक्सवेलची अर्धशतकी खेळीबरोबरच ‘मोठ्या’ विक्रमाला गवसणी, ठरला ५ वाच ऑसी क्रिकेटर
चपळतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीचा परागच्या डायरेक्ट थ्रोने केला घात, पाहा व्हिडिओ