भारतीय क्रिकेट इतिहासात अनेक गौरवशाली क्षण आहे. त्यातीलच एक म्हणजे 2011 साली भारतीय संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर जिंकलेला विश्वचषकाचा अंतिम सामना. हा विश्वचषक जिंकून आज (2 एप्रिल) 11 वर्षे पूर्ण होत आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 12 वर्षापूर्वी, 2 एप्रिल 2011 ला विश्वचषक जिंकला होता. जिंकण्यासाठी धोनीने लगावलेला षटकार 125 करोड भारतवासियांच्या मनात आजही ताजेतवाना आहे.
भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नुवान कुलसेकराच्या गोलंदाजीवर षटकार खेचत तब्बल 28 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भारताला विश्वचषक मिळवून दिला होता. या आधी 25 जून 1983 ला भारताने कपील देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला विश्वचषक जिंकला होता.
अंतिम फेरीत भारतासमोर होते 275 धावांचे आव्हान
भारत आणि श्रीलंका यांच्यात 2011 च्या विश्वचषकाची अंतिम फेरी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळली गेली होती. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 50 षटकात 6 गड्यांच्या बदल्यात 274 धावा केल्या होत्या.
श्रीलंकेच्या जयवर्धनेने 103 धावांची शानदार खेळी केली होती, तर कुमार संगकाराने 48 धावा फटकावल्या होत्या. भारताच्या झहीर खान व युवराज सिंग यांनी 2-2 बळी घेतले. तर श्रीसंतनेही 1 बळी टिपला होता.
गौतमची ‘गंभीर’ खेळी
आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात काही विशेष झाली नाही. २७५ धावांचा पाठलाग करताना वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर लवकर बाद झाले. पण नंतर आलेल्या गौतम गंभीरने 96 धावांची खेळी करत भारताला विजयापर्यंत पोहोचवले. पाचव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या धोनीने नाबाद 91 धावा करत भारताला विजय मिळवून दिला. धोनी आणि गंभीर यांच्यात झालेली 109 धावांची भागीदारी भारताला हा विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची ठरली होती. नंतर धोनीने 10 चेंडू बाकी असताना भारताला विजयी करत सचिनचे स्वप्न पूर्ण केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा खर्च करणाऱ्यांमध्ये शार्दुल ठाकूरचंही नाव, पाहा संपूर्ण यादी
BREAKING । दिग्गज भारतीय अष्टपैलू काळाच्या पडद्याआड, जानेवारीत झालेली मोठी शस्त्रक्रिया