आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज, 20 जूनला पुरुषांच्या क्रिकेटमधील 2018-2023 या दरम्यानचा भविष्यातील कार्यक्रम घोषित केला आहे.
यात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांच्या सामन्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे मुख्य लक्ष द्विपक्षिय क्रिकेटकडे असणार आहे.
यामध्ये कसोटी चॅम्पियनशिप आणि वनडे लीगच्या वेळापत्रकाचीही माहिती दिली आहे.
पहिल्या कसोटी चॅम्पियनशिपमध्ये क्रमवारीतील पहिले 9 संघ सहभागी होतील. ही स्पर्धा 15 जुलै 2019 ते 30 एप्रिल 2021 दरम्यान होणार आहे. या 2 वर्षांच्या कालावधी दरम्यान प्रत्येक संघ 6 मालिका खेळेल. यात मायदेशात आणि परदेशात होणाऱ्या मालिकांचा समावेश आहे.
त्यानंतर अव्वल दोन संघ जून 2021 मध्ये अंतिम फेरी खेळतील. यात जो संघ विजयी ठरेल कसोटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवेल.
याचबरोबर आयसीसीची वनडे लीग सुरु होईल. यात कसोटी क्रिकेटचा दर्जा असलेले 12 संघ आणि नेदरलँडस् असे 13 संघ सामील होती.
ही स्पर्धा 1 मे 2020 पासून ते 31 मार्च 2022 दरम्यान होणार आहे. या दरम्यान प्रत्येक संघ सहमती असलेल्या प्रतिस्पर्ध्यांशी एकूण 8 मालिका खेळेल. यामध्येही मायदेशात आणि परदेशात होणाऱ्या मालिकांचा समावेश आहे.
ही स्पर्धा 2023 ला होणाऱ्या विश्वचषकाच्या पात्रतेचा मार्गही असेल. 2023 च्या विश्वचषकाचा यजमान असलेला भारत आणि क्रमवारीतील पहिले 7 संघ या विश्वचषकासाठी थेट पात्र ठरतील.
तसेच तळातील 5 संघांना या विश्वचषकासाठी पात्र ठरण्यासाठी दुसरी संधी मिळेल. या पाच संघांना विश्वचषक पात्रता फेरी खेळावी लागेल.
पुरुष क्रिकेटच्या भविष्यातील कार्यक्रमाची तयारी करणाऱ्या सदस्यांचे त्यांनी घेतलेल्या कष्टाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी अभिनंदन केले आहे.
असा असेल भविष्यातील कार्यक्रम (2018-2023)
-आयसीसी विश्वचषक – 2019 आणि 2023
-टी20 विश्वचषक – 2020 आणि 2021
– कसोटी चॅम्पियनशिप
– सायकल 1 – 2019-2021(अंतिम फेरी 2021)
– सायकल 1 – 2021-2023(अंतिम फेरी 2023)
– वरील स्पर्धा वगळता द्विपक्षिय कसोटी, वनडे आणि टी 20 सामने
https://twitter.com/ICC/status/1009387320057978880
https://twitter.com/ICC/status/1009387324000604162
https://twitter.com/ICC/status/1009387327804903424
https://twitter.com/ICC/status/1009387331558748161
https://twitter.com/ICC/status/1009387335534997510
महत्त्वाच्या बातम्या:
–फिफा विश्वचषकात खेळणाऱ्या स्टार खेळाडूने मानले विराटचे आभार!
–त्या लोकांना पाहुन कॅप्टन कुल धोनी म्हणाला; भनक लागली वाटतं!
–चक्क वनडेत फाॅलो-आॅन??? आॅस्ट्रेलियन संघाची सोशल मीडियावर चेष्टा!






