फिफाने २०१८च्या ‘मेन्स बेस्ट प्लेयर अवॉर्डची’ घोषणा केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत पहिल्या तीनमध्ये स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीचे नाव नाही. १२ वर्षांत प्रथमच मेस्सीचा या यादीत समावेश नाही.
या यादीच्या अंतिम तीनमध्ये क्रिस्तियानो रोनाल्डो, लुका मोड्रीच आणि मोहमद सलाह यांचा समावेश आहे. हे तिघे चॅम्पियन्स लीगच्या प्लेयर ऑफ द इयरमध्येही होते. पण हा पुरस्कार मोड्रीचला मिळाला होता.
Finalists: #TheBest FIFA Men's Player Award 🏆
🇵🇹 @Cristiano
🇭🇷 @lukamodric10
🇪🇬 @MoSalah#FIFAFootballAwards pic.twitter.com/L1ckRiZTv6
— FIFA (@FIFAcom) September 3, 2018
रोनाल्डोने रियल माद्रीदला सलग तीनदा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून दिले आहे. तर यामध्ये मोड्रीचचाही समावेश होता. तसेच मोड्रीचने पहिल्यांदाच क्रोएशियाचे नेतृत्व करताना संघाला रशियात झालेल्या २०१८ फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहचण्यास मदत केली होती.
तसेच इजिप्तच्या सलाहने या वर्षात झालेल्या विविध स्पर्धेत लीव्हरपूलसाठी ४४ गोल केले आणि संघाला चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत पोहचण्यास मदत केली.
मेस्सीला रशियाच्या फिफा विश्वचषकात अर्जेंटीना आणि युरोपामध्ये बार्सिलोनाच्या संघाकडून खेळताना संघर्ष करावा लागला असला तरीही त्याने ला लीगा आणि कोपा डेल रेचे विजेतेपद मिळवून दिले आहे. तसेच या वर्षांत त्याने ५४ सामन्यांत ४५ गोल केले आणि युरोपियन गोल्डन शूज जिंकला.
फिफाने जाहिर केलेल्या या यादीत पहिल्या तीनमध्ये २०१८ फिफा विश्वचषक विजेत्या फ्रान्सच्या खेळाडूंची नावे नाहीत. मात्र राफेल वॅरने, अटिंनो ग्रीजमन आणि कायलिन एमबाप्पे यांना पहिल्या दहामध्ये स्थान मिळवण्यात यश आले आहे.
तसेच उत्कृष्ठ गोलकिपरमध्ये थिबाऊ कोर्टीस (बेल्जियम आणि रियल माद्रीद), ह्युगो लोरिस (फ्रान्स आणि टोटेनहॅम हॉट्स्पर) आणि कॅस्पर स्मायकल (डेन्मार्क आणि लेसिस्टर सिटी) यांची निवड करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी कूकने दवडली…!!!
–एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक विजेत्या रोव्हर्सचे पुणेकरांनी केले उत्साहात स्वागत