अर्जेंटीना आणि बार्सिलोना स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी हा आज त्याचा चौथा फिफा विश्वचषक खेळत आहे. यापूर्वी तो 2006, 2010 आणि 2014 विश्वचषकात खेळला आहे.
मेस्सीने विश्वचषकातील 15 सामन्यांमध्ये 5 गोल केले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर 124 सामन्यात 64 गोल केले असून तो भारतीय कर्णधार सुनिल छेत्रीसह सध्या खेळत असलेल्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
छेत्रीने 101व्या सामन्यातच 64 गोल केले आहेत. आज मेस्सीला छेत्रीच्या पुढे जाण्याची संधी आहे.
विशेष म्हणजे आजच्याच दिवशी 16 जूनला मेस्सीने 2006मध्ये विश्वचषकातील पहिला गोल केला होता.
30 वर्षीय मेस्सीने या विश्वचषकाच्या पात्रता फेरीतील 10 सामन्यामध्ये 7 गोल केले आहेत. तर कोपा अमेरिका ह्या स्पर्धेतील 11 सामन्यात 6 गोल केले आहेत.
त्याने बार्सिलोनासाठी 32 ट्रॉफीज जिंकल्या आहेत. त्यातील 9 लालीगा, 4 युरोपियन लीग आणि 6 स्पॅनिश कप, 5 बॅलोन डी’ओर आणि 5 युरोपियन गोल्डन अशा त्या ट्रॉफीज आहेत.
कर्णधार झाल्यावर संघाला तीन मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचवले
मेस्सीने 600 गोल क्लबसाठी केले आहेत. 2006च्या विश्वचषक खेळणारा आणि त्यात गोल करणार तो अर्जेंटीनाकडून तरूण खेळाडू ठरला.
2011 मध्ये कर्णधार झाल्यावर त्याने संघाला 2014च्या विश्वचषकात, 2015ला कोपा अमेरिका आणि 2016च्या कोपा अमेरिका ह्या तीन मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचवले.
काल झालेल्या सामन्यात पोर्तुगलच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने दाखवून दिले की वयाचा खेळावर काहीही परिणाम होत नाही.
30 वर्षीय रोनाल्डोने काल स्पेन विरूद्धच्या सामन्यात ह्या विश्वचषकातील पहिली तर स्वतच्या कारकिर्दीतील 51वी हॅट्ट्रिक केली. तसेच ही आतापर्यंतची फिफा विश्वचषकातीलही 51वी हॅट्ट्रिक ठरली.
रोनाल्डोप्रमाणे मेस्सीही आजच्या आइसलॅंड विरूद्धच्या सामन्यात अशीच कामगिरी करतो का हे पाहण्याचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या :
–कालच्या सामन्यात हॅट्रिक केलेल्या रोनाल्डोला होऊ शकतो तुरुंगवास?
–फिफा विश्वचषक ट्रॉफीची अनोखी कहानी….
–ख्रितियानो रोनल्डोने फिफा विश्वचषकातील खास विक्रम केला आपल्या नावे