---Advertisement---

अबब! लिओनेल मेस्सीला बार्सिलोनाच्या करारातून मिळणारी किंमत ऐकून व्हाल थक्क

---Advertisement---

अर्जिंटीनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीने आत्तापर्यंत अनेक मोठे विक्रम प्रस्तापित केले आहेत. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्येही त्याची गणना केली जाते. त्यामुळे त्याला क्लब स्थरावर मिळणारा बक्कळ पैसा, हे काही नवीन नाही. पण तरीही हा पैसा किती असावा, याचा अंदाज जर आपण बांधायला गेलो तर अनेकांची बोबडी वळेल.

नुकताच स्पेनमधील एका वृत्तपत्राने त्याला बार्सिलोना क्लबकडून मिळणाऱ्या रकमेबाबत मोठा खुलासा केला आहे. स्पेनमधील ‘द एल मुंडो’ या वृत्तपत्राने रविवारी(३१ जानेवारी) मेस्सीच्या बार्सिलोनाबरोबर झालेल्या करारा संदर्भात खळबळजनक खुलासा केला होता.

वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार मेस्सीला ४ हंगामासाठी ५५ कोटी ५० लाख युरो (साधारण ६७.३ कोटी डॉलर) मिळत आहेत. त्यामुळे या कराराला खेळातील सर्वोत महागड्या करारांपैकी एक मानले जात आहे.

तसेच या वृत्तपत्राने असाही दावा केला आहे की त्यांच्याकडे ३० पानांचे पुरावे आहेत, ज्यात मेस्सीने २०१७ साली बार्सिलोनासह करार करताना स्वाक्षरी केली आहे. मेस्सीच्या सॅलरी रकमेशिवाय या वृत्तामध्ये त्याला मिळणाऱ्या निश्चित उत्पन्नाची आणि व्हेरिएबल्सचाही उल्लेखही करण्यात आला आहे, जे त्याला प्रत्येक हंगामात १३ कोटी ८० लाख युरोंपर्यंत पोहचवू शकतात.

या वृत्तात असाही उल्लेख आहे की ३३ वर्षीय मेस्सीने या करारापैकी आधीच ५१० मिलियन युरोपेक्षा अधिक रक्कम मिळवली आहे.

गेले २ दशके बार्सिलोनाकडून फुटबॉल खेळत असलेल्या मेस्सी यंदा क्लबची साथ सोडण्यास इच्छुक होता, मात्र करारामुळे हे शक्य झाले नसल्याची चर्चा मधल्या काळात झाली होती. पण असे असले तरी चालू हंगाम संपल्यानंतर मेस्सी बार्सिलोनाची साथ सोडू शकतो. त्यामुळे त्याला घेण्यास इच्छुक असलेल्या क्लबला त्याच्या कराराची माहिती मिळावी म्हणून ही माहिती लिक झाली असण्याची चर्चा माध्यमात सुरु आहे.

मेस्सीने बार्सिलोनाला ३० पेक्षाही अधिक विजेतीपदे मिळवून दिली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

प्रेयसीचा वाढदिवस साजरा करणं रोनाल्डोला पडलं महागात, होऊ शकतो ‘इतक्या’ रुपयांचा दंड

क्रिकेट प्रमाणे फुटबॉलमध्येही असणार कन्कशन सब्सटिट्यूट, ‘या’ टूर्नामेंटपासून होणार सुरुवात 

पोर्तुगालचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो ठरला सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू, ‘या’ दिग्गजांना टाकले मागे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---