जर्मनचा माजी फुटबॉलपटू मेसट ओझीलला पाठींबा देण्यासाठी चाहत्यांनी ट्विटरवर #Me Two ही चळवळ सुरू केली आहे.
जर्मनीतून अल्पसंख्यक लोक त्याला पाठींबा देण्यासाठी पुढे येत आहेत. या लोकांनी #Me Two असा हॅशटॅग देऊन आपापली कथा, मते सांगितली आहेत.
#MeToo हा हॅशटॅग लैंगिक अत्याचारासाठी तर #metwo किंवा #Me Two हा हॅशटॅग लोक वंशभेदासाठी वापरत आहेत.
I was born in Germany and had to take an oral exam at the university Essen. My German professor asks at the beginning "How are you? How do you like Germany? And when will you back home to your country? My answer was "I was born here 25 years ago and this is my home." #MeTwo
— Ardalan Hashemi (@ardalanhashemi) July 28, 2018
I often get asked when I'm Germany: "Where are you from?" – "Germany." – "I mean, where are you really from?" – "Germany." – "But where are your parents from?" #MeTwo
— Caroline Hambloch (@CaroHambloch) July 27, 2018
वंशभेदामुळे ओझीलला जर्मन फुटबॉल संघातून बाहेर पहावे लागले. तो मुळचा तुर्कीचा असला तरी त्याचा जन्म आणि पूर्ण बालपण जर्मनीतच झाले आहे. त्याने तुर्कीचे राष्ट्रपती रजब तैयब एर्दोगन यांच्यासोबत काढलेल्या फोटोमुळे त्याच्यावर सातत्याने वंशभेदी टिका होत होती.
जर्मनी फुटबॉल महासंघाने ओझीलचा वंशभेदी टिकेपासून बचाव केला नाही असा आरोप त्याने केला होता. म्हणूनच त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली. पण जर्मनी फुटबॉल महासंघाने ओझीलचे हे आरोप फेटाळले.
सध्या ओझील इंटरनॅशनल चॅम्पियन्स कपमध्ये अर्सेनलकडून खेळत आहे. काल (28 जुलै) झालेल्या पॅरीस सेंट-जर्मन विरूद्धच्या सामन्यात अर्सेनलचे नेतृत्व करताना त्याने 13व्या मिनिटाला गोल केला. हा सामना अर्सेनलने 5-1ने जिंकला.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–कुलदीप नकोच, अश्विनच बेस्ट; ऑस्ट्रेलियाच्या माजी फलंदाजचे मत
–नाणेफेक झाली चक्क क्रेडिट कार्डने!