मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात शेवटच्या षटकात मुंबई इंडियन्स संघाला ४ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. मुंबई इंडियन्स संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १२९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने ५ चेंडू शिल्लक ठेऊन हा सामना आपल्या नावावर केला होता. या पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. हा संघ १० गुणांसह आयपीएल स्पर्धेच्या गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. तरीदेखील मुंबईचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड यांना विश्वास आहे की, मुंबई इंडियन्स संघ अजूनही प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड यांनी म्हटले की, “आम्ही चांगलं खेळतोय. आम्हाला माहीत आहे की, आम्ही सर्वोत्कृष्ट कामगिरी नाही करत आहोत. तरीदेखील आम्ही स्पर्धेत टिकून आहोत. आम्ही पाहतोय की, पुढे काय होणार. आम्ही या स्पर्धेत आतापर्यंत एकूण ५ सामने जिंकले आहेत. जर उर्वरित २ सामने आम्ही मोठ्या फरकाने जिंकलो आणि इतर संघांपेक्षा पुढे निघालो तर आम्ही प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “आम्ही विचार केला होता की, जर आम्हाला १४५ च्या आसपास धावा करण्यात यश आले तर आम्ही हा सामना जिंकू शकतो. ही विचारसरणी गोलंदाजांनी खरी ठरवली होती. परंतु मला वाटते की, दिल्लीने मधल्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली आणि आमच्या गोलंदाजांविरुद्ध मोठे फटके खेळण्याचा देखील प्रयत्न केला. आम्हाला माहीत होते की, या धावांचा बचाव करणे थोडे कठीण जाईल.”
मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केली आहे. सध्या हा संघ आयपीएल स्पर्धेच्या गुणतालिकेत १० गुणांसह सातव्या स्थानी आहे. तर मुंबईचे उर्वरित दोन सामने कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स संघाविरुद्ध रंगणार आहे.या अजून ३ संघांचे सध्या १०-१० गुण आहेत. या तिन्ही कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स संघाचे देखील प्रत्येकी २-२ सामने शिल्लक आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल तर उर्वरित दोन सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आधी सीएसकेविरुद्ध १९ चेंडूत झळकावलं तूफानी अर्धशतक, नंतर धोनीकडून यशस्वीला ‘ग्रेटभेट’
प्लेऑफचे सामने सुरू होण्यापूर्वी सीएसकेला मोठा धक्का, ४ अर्धशतक ठोकणारा ‘हा’ फलंदाज जखमी
इथेच अडलीय गाडी; दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर रोहितचं पडलं तोंड, सांगितली कुठे होतेय चूक?






