दक्षिण आफ्रिका टी20 लीगमधील (एसए20) मुंबई इंडियन्सची मालकी असलेल्या एमआय केपटाउन फ्रँचायझीने त्यांच्या प्रशिक्षण स्टाफची घोषणा केली आहे. बुधवारी (14 सप्टेंबर) मुंबई इंडियन्सने झहीर खान आणि माहेला जयवर्धने यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती. यानंतर आता गुरुवारी (15 सप्टेंबर) एसए20 लीगच्या लिलावापूर्वी एमआय केपटाउनने मुख्य प्रशिक्षकापासून ते फलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि जनरल मॅनेजरची नावे जाहीर केली आहेत.
ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज फलंदाज सायमन कॅटिच (Simon Katich) एमआय केपटाउन (MI Capetown) संघाचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. तर दक्षिण आफ्रिकाचे माजी महान फलंदाज हाशिम आमला (Hashim Amla) यांना फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे. मुंबई इंडियन्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स पैमेंट यांच्यावर एमआय केपटाउन संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदाची अतिरिक्त जबाबदारी सांभाळतील. तसेच दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू रॉबिन पीटरसन हे या संघाचे जनरल मॅनेजर असतील.
WELCOME, COACH KATICH! 🙌
We are eXXcited to announce that Simon Katich has joined the #OneFamily and will be the Head Coach of MI Cape Town! 💙
Read more here: https://t.co/36VSv8n7F0 #OneFamily #MICapeTown #SA20 @SA20_League pic.twitter.com/BFBigOjVvv
— MI Cape Town (@MICapeTown) September 15, 2022
ROBBIE P TAKES THE REIGNS! 👌
In @robbie13flair we have a GM who has experienced all spheres of the game!🙌
Read more here: https://t.co/36VSv8n7F0#OneFamily #MICapeTown #SA20 @SA20_League pic.twitter.com/Te3gzwMZhy
— MI Cape Town (@MICapeTown) September 15, 2022
मुंबई इंडियन्स आणि एमआय केपटाउन संघांचे मालक आकाश अंबानी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “मला एमआय केपटाउनच्या प्रशिक्षण स्टाफमध्ये सायमन आणि हाशिमचे स्वागत करताना खूप आनंद होत आहे. जेम्स आणि रॉबिनसोबत आम्ही एक असा संघ बनवणार आहोत, जो दक्षिण आफ्रिकेत क्रिकेटच्या एमआय ब्रँडला विकसित करेल आणि या क्रिकेटप्रेमी देशात एमआयचे मूल्य आणि लोकाचार वाढवेल.”
HOWZIT, HASHIM!
Here we go! @amlahash has officially joined MI Cape Town as our batting coach. 🤩
Read more here: https://t.co/r5u0Wwwtsp#OneFamily #MICapeTown #SA20 @SA20_League pic.twitter.com/cQxjF0alwb
— MI Cape Town (@MICapeTown) September 15, 2022
THE COMMANDER JOINS MI CAPE TOWN 💪
We’re sure the boys will be ready to put their bodies on the line in the field with Commander @JimmyPamment in charge! 💙
Read more here: https://t.co/36VSv8mzPs#OneFamily #MICapeTown #SA20 @SA20_League pic.twitter.com/5p41RXXpyZ
— MI Cape Town (@MICapeTown) September 15, 2022
याबरोबरच मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक माहेला जयवर्धने आणि झहीर खान यांच्यावरही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्ससह आंतरराष्ट्रीय लीग टी20 मध्ये एमआय इमिरेट्स आणि दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्ये एमआय केपटाउन या दोन फ्रँचायझींच्या प्रदर्शनात सुधारणा करण्यासाठी जयवर्धने कार्यरत असतील. त्यांना ग्लोबल हेड ऑफ परफॉरमन्स पदी नियुक्त (Global Head of Performance) करण्यात आले आहे.
जयवर्धने यांच्याबरोबरच झहीर खान यांच्यावरही नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. झहीर यांना मुंबईच्या तिन्ही फ्रँचायझीचे ग्लोबल हेड ऑफ क्रिकेट डेव्हलपमेंट (Global Head of Cricket Development) बनवण्यात आले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एलिसा पेरीने तोडला विश्वविक्रम, ‘इतके’ किमी पळत येत डेविड वॉर्नरला केली बॉलिंग
टी20 विश्वचषकात येणार नाही मजा! सात-सात वर्ल्डकप खेळलेले वेस्ट इंडिजचे दिग्गजच बाहेर
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाच्या 5 वेळच्या विश्वविजेत्या क्रिकेटरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती