SA20: दक्षिण आफ्रिकेची प्रसिद्ध टी20 लीग SA20 ची सुरुवात 9 जानेवारी रोजी झाली. ज्यामध्ये गतविजेत्या सनरायझर्स ईस्टर्न केपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या हंगामात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या एमआय केपटाऊन संघाने सनरायझर्सचा 97 धावांनी पराभव केला. ज्यात 28 वर्षीय अष्टपैलू खेळाडू डेलानो पॉटगीटरने एमआयच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कारण त्याने बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. पॉटगीटरने प्रथम 12 चेंडूत 25 धावा करत केपटाऊनला 174/7 पर्यंत पोहोचवले आणि नंतर चेंडूने कहर केला, सनरायझर्स संघाचा अर्धा संघ एकट्याने बाद केला. यासह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पॉटगीटरने त्याच्या तीन षटकांत 10 धावा देत 5 बळी घेतले. अशाप्रकारे त्याने SA20 ची चेंडूसह दुसरी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. एवढेच नाही तर, SA20 मध्ये आतापर्यंतच्या कोणत्याही मध्यमगती गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
SA20 मधील सर्वोत्तम गोलंदाजी आकडेवारी
रोएलॉफ व्हॅन डर मेर्वे: 4 षटकांत 6/20
डेलानो पॉटगीटर: 3 षटकांत 5/10
नूर अहमद: 3.2 षटकांत 5/11
ज्युनियर डाला: 4 षटकांत 5/26
मार्को जॅन्सेन: 4 षटकांत 5/30
MI CAPE TOWN 🌟
– MI Cape Town defeated Defending Champions Sunrisers Eastern Cape by 97 runs, What a start to the SA20 2025 season.
25*(12) & 5 wickets by Delano Potgieter was the star of the show for MI franchise. pic.twitter.com/U3jx1PmfCO
— Johns. (@CricCrazyJohns) January 9, 2025
ट्रेंट बोल्ट, अझमतुल्लाह उमरझाई आणि जॉर्ज लिंडे यांना बाद केल्यानंतर सनरायझर्स आधीच अडचणीत सापडले होते आणि त्यानंतर पॉटगीटरने आपल्या शानदार गोलंदाजीने मधल्या फळी आणि खालच्या मधल्या फळीला बाद केले. गतविजेत्या संघाने 48 धावांत चार विकेट गमावल्या असताना 11 व्या षटकात पॉटगीटर गोलंदाजी करायला आला. यानंतर, अष्टपैलू पॉटगीटरने त्याच्या पहिल्याच षटकात तीन विकेट घेत खळबळ उडवून दिली. त्याने पहिल्याच चेंडूवर क्रमांक 6 च्या बेयर्स स्वानेपोएलला बाद करून आपले खाते उघडले आणि तिसऱ्या चेंडूवर डेव्हिड बेडिंगहॅमला बाद केले. त्यानंतर षटकाच्या पाचव्या चेंडूवर, पॉटगीटरने एडेन मार्क्रमच्या रूपात त्याचा तिसरा बळी घेतला.
पहिल्याच षटकात 3 बळी घेणारा पॉटगीटर 13 व्या षटकात परतला. ज्यात त्याने लियाम डॉसनला बाद केले. लियाम डॉसनला फक्त 6 धावा करता आल्या. यानंतर, पॉटगीटर 15 व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला आणि रिचर्ड ग्लीसनला पॅव्हेलियनमध्ये पाठवून त्याने आपल्या संघाला एमआय केपटाऊनवर 97 धावांनी मोठा विजय मिळवून दिला. पॉटगीटरने 5 विकेट घेतल्या. यासह, तो जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा सारख्या गोलंदाजांच्या खास क्लबमध्ये सामील झाला. टी20 लीगमध्ये पाच विकेट्स घेणारा तो एमआय फ्रँचायझीचा सातवा गोलंदाज आहे.
फ्रँचायझी लीगमध्ये पाच विकेट घेणारे एमआयचे गोलंदाज
लसिथ मलिंगा: 2011 मध्ये आयपीएल विरुद्ध डीडी
हरभजन सिंग: 2011 मध्ये आयपीएल विरुद्ध सीएसके
मुनाफ पटेल: 2011 मध्ये आयपीएल विरुद्ध केएक्सआयपी
लसिथ मलिंगा: 2012 मध्ये आयपीएल विरुद्ध सीएसके
अल्झारी जोसेफ: 2019 मध्ये आयपीएल विरुद्ध एसआरएच
जसप्रीत बुमराह: 2022 मध्ये आयपीएल विरुद्ध केकेआर
आकाश माधवाल: 2023 मध्ये आयपीएल विरुद्ध एलएसजी
जसप्रीत बुमराह: 2024 मध्ये आयपीएल विरुद्ध आरसीबी
डेलानो पॉटगीटर: 2025 मध्ये SA20 विरुद्ध सनरायझर्स ईस्टर्न केप
हेही वाचा-
‘अनादरपूर्ण वागणूक आणि अपमान…’, आर अश्विनच्या निवृत्तीवर माजी क्रिकेटपटूची खळबळजनक प्रतिक्रिया
Champions Trophy; इंग्लंडनंतर आता आफ्रिकेची अफगाणिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी
‘रिषभ पंत बाहेर, केएल राहुल…’, इंग्लंड मालिकेसाठी क्रिकेट पंडित संजय मांजरेकरांनी निवडला संघ