इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा हंगाम सुरू झाला असून रविवारी (२७ मार्च) पहिला डबल हेडर खेळवला गेला. डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात ५ वेळचे आयपीएल विजेते मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ आमने सामने होते. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ५ बाद १७७ धावा केल्या होत्या. मुंबईकडून सलामीवीर इशान किशन याने नाबाद ८१ धावा चोपल्या.
त्याच्याव्यतिरिक्त अजून एका मुंबईकराने प्रभावी कामगिरी केली आहे. हा खेळाडू अजून कोणी नसून, १९ वर्षीय तिलक वर्मा (Tilak Varma) आहे. वर्माने दिल्लीविरुद्ध आयपीएल पदार्पण करताना (IPL Debut Against DC) छोटेखानी पण शानदार खेळी केली आहे.
मुंबईचा संघ २ बाद ८३ धावा अशा स्थितीत असताना चौथ्या क्रमांकावर हा डावखुरा युवा फलंदाज फलंदाजीसाठी आला होता. त्याने त्याने कुलदिप यादव, ललित यादव, खलील अहमद यांसारख्या अनुभवी गोलंदाजांचा सामना करताना चक्क १४६.६७ च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या. त्याने १५ चेंडू खेळताना ३ खणखणीत चौकारांच्या मदतीने २२ धावा फटकावल्या.
A promising debut for Varmaji. 22(15) with 3⃣ glorious boundaries. 🙌💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #DCvMI pic.twitter.com/joqbugmYuo
— Mumbai Indians (@mipaltan) March 27, 2022
अखेर खलील अहमदने पंधराव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर पृथ्वी शॉच्या हातून त्याला झेलबाद केले. मात्र पदार्पणाच्या सामन्यात मोठ्या गोलंदाजांचा सामना करताना त्याने केलेली ही छोटेखानी खेळीही फार प्रभावी ठरली आहे.
कोण आहे तिलक वर्मा?
तिलक वर्मा (Tilak Varma Informationj) हैदराबाद संघासाठी रणजी क्रिकेट खेळतो. तसेच भारतीय १९ वर्षांखालील संघासाठी त्याने क्रिकेट खेळले आहे. या संघात प्रवेश करण्यापूर्वी त्याने १६ वर्षांखालील संघात चांगली कामगिरी केली होती. तसेच विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्याने हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत त्याने १८० धावा केल्या होत्या. तसेच दिल्ली विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने १३९ धावांची खेळी केली होती.
५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकलेल्या मुंबई इंडियन्सने मेगा लिलावात त्याला तब्बल १.७ कोटी रुपये खर्च करत विकत घेतले होते. आता पदार्पणाच्या आयपीएल सामन्यातच प्रभावी खेळी करत युवा वर्माने संघाचा विश्वास सार्थकी लावला आहे. मुंबई संघ त्याची कामगिरी पाहता, त्याला पुढील सामन्यांमध्येही संधी देऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
सीएसकेविरुद्ध उमेश यादव सामनावीर तर ठरलाच, पण बुमराह, मलिंगाला मागे टाकत याबाबतीत ठरला अव्वल
कौतुकाची थाप आणि अनुभवाचा सल्ला! युवराजकडून शेल्डन जॅक्सनला खास संदेश