अमेरिकेत पहिल्यांदा आयोजित केलेल्या मेजर लीग टी-20 स्पर्धेचे विजेतेपद मुंबई इंडियन्सच्या मालकिची एमआय न्यू यॉर्क संघाने पटकावले. मेजर लीगच्या या पहिल्यां हंगामात एमआय न्यू यॉर्क आणि सिएटल ऑर्कास यांच्यात खेळला गेला. निकोलस पूरन याच्या नेतृत्वातील न्यू यॉर्क संघाने हा सामना 7 विकेट्स राखून जिंकला. पूरन देखील कर्णधारपदाला साजेळी खेळी करू शकला.
एमआय न्यू यॉर्क (MI New York) संघाने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या सिएटल ऑर्कास (Seattle Orcas) संघाने 20 षटकात 9 बाद 183 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात एमआय न्यू यॉर्कसाठी कर्णधार निकोलस पूरन (Nicholas Pooran) याने अवघ्या 55 चेंडूत 137* धावा केल्या. पूरनच्या या वादळी खेळीच्या जोरावर न्यू यॉर्कने हा सामना अवघ्या 16 षटकात आणि तीन विकेट्सच्या नुकसानावर गाठला. पूरनला सामनावीर म्हणून निवडले गेले. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या मालकिचे संघ जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळत असून हे त्यांचे नववे विजेतेपद आहे.
The kind of 𝐌𝐨𝐧𝐝𝐚𝐲 𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐥𝐮𝐞𝐬 we like 🫶😍
Congratulations, @MINYCricket 💙#OneFamily #MumbaiIndians pic.twitter.com/JHTZCBXjEO
— Mumbai Indians (@mipaltan) July 31, 2023
न्यू यॉर्क संघाला मेजर लीगचे विजेतेपद मिळवून देण्यासाठी पूरनसह गोलंदाजी विभागाचेही खास योगदान राहिले. राशिद खान आणि ट्रेंट बोल्ट यांनी अंतिम सामन्यात प्रत्येकी तीन तीन विकेट्स घेतल्या. स्टीवन टायलर आणि डेव्हिड विसे यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. फलंदाजांमध्ये एकटा निकोलस पूरन वगळता एमआय न्यू यॉर्कचा एकही फलंदाज 20 धावांचा टप्पा पार करू शकला नाही.
सिएटल ऑर्कास संघासाठी सलामीला आलेला यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक याने 52 धावा 87 धावांची अप्रतिम खेळी केली. पण डी कॉकला संघातील इतर खेळाडूंची साथ मिळू शकली नाही. परिणामी सिएटल संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला. त्यांच्यासाठी इमाद वसीम आणि कर्णधार वेन पार्नेल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (MI New York have won the innaugural edition of Major League Cricket. )
महत्वाच्या बातम्या –
कॅनडात चमकले महाराष्ट्राचे पठ्ठे! विजय चौधरी, राहुल आवारे आणि नरसिंह यादवचे सोनेरी यश
Ashes 2023 । ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी बॅटने केला कहर! ख्वाजाचे नाव दिग्गजांमध्ये सामील