मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात गुरुवारी (दि. 11 एप्रिल) वानखेडे मैदानावर आयपीएलचा 25वा सामना रंगणार आहे. तीन सामन्यातील पराभवानंतर चौथ्या सामन्यात मुंबई संघाने विजयाची चव चाखली. आणि आता मुंबई त्यांच्या पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या आरसीही संघासोबत भीडणार आहे. अशात मुंबईच्या यंदाच्या पहिल्या विजयात सिंहाचा वाटा असलेल्या रोहित शर्मा कडून सर्वांनाच आज चांगली अपेक्षा असणार आहे. ही अपेक्षा संघातील प्रत्येक खेळाडू आणि संघमालकांनाही असणार, यात शंका नाही. अशात बुधवारी अर्थात MI VS RCB सामन्याच्या पुर्वसंध्येला मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि संघमालक आकाश अंबानी हे एकाच कारमधून प्रवास करताना दिसले. महत्वाचे म्हणजे यावेळी आकाश अंबानी हा रोहित शर्मा याच्या कारचे सारथ्य करताना दिसून आला. ( MI owner Akash Ambani drives Rohit Sharma to Wankhede ahead of RCB Match Watch Video )
मुंबई इंडियन्स म्हटलं की सर्वांच्या डोळ्यापुढे दिसतो तो रोहित शर्मा. परंतू त्यासोबतच सर्वांच्या डोक्यात नाव येतं ते म्हणजे अंबानी. निता अंबानी आणि त्यांचे पुत्र आकाश अंबानी हे मुंबई इंडियन्सचे मालक आहेत. मुंबईच्या बहुतांश सामन्यावेळी हे दोन्ही मायलेक आपल्या मैदानावर दिसतात. संघ हरू अथवा जिंकू ते दोघेही नेहमी संघाच्या पाठीशी उभे राहिलेले दिसतात. अशात संघातील प्रत्येक खेळाडूप्रति त्यांना जिव्हाळा देखील आहे. त्यातही मुंबई इंडियन्स संघाचा आयपीएलमध्ये दबदबा निर्माण करण्यात आली संघाला 5 आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या रोहित शर्मा बद्दलही या टीम मालकांना चांगलीच आपुलकी आणि आदर आहे. त्यामुळेच आकाश अंबानी याला रोहित शर्माच्या गाडीचे सारथ्य करण्यात कोणताही उणेपना वाटला नाही. हेच यांच्यातील बाँडिंग दाखवून देतं.
BREAKING NEWS 🚨🚨🚨
Anant Ambani has been Appointed as latest driver of captain Rohit Sharma’s car 🔥🔥🔥
Rohit Sharma single Handedly Owning Ambani’s son .
— Shubham 𝕏 (@DankShubhum) April 10, 2024
Akash Ambani driving for captain Rohit Sharma
When you’re big, you’re big 🔥🐐
pic.twitter.com/riQ06Ou7Kg— Nisha (@NishaRo45_) April 10, 2024
अधिक वाचा –
– महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेचा लिलाव उत्साहात, सोलापूर रॉयल्सकडून नौशाद शेखला सर्वाधिक किंमत
– भारतात क्रिकेट म्हणजे धर्म! चाहत्यानं केली हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सची आरती, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
– आयपीएलमध्ये लागू होणार नवा नियम; कमकुवत टीमसाठी ट्रॉफी जिंकणे होणार आणखीनच अवघड