कोरोना विषाणूमुळे आयपीएल २०२१ अवघ्या २९ सामन्यांनंतर पुढे ढकलली गेली. त्याआधी आयपीएलच्या काही सामन्यांमध्ये प्रेक्षकांना प्रचंड थरार पाहायला मिळाला. मागील वर्षीप्रमाणे यावेळही प्रेक्षकांशिवाय आयपीएल खेळली जात होती. अशा परिस्थितीत क्रिकेट चाहत्यांकडे हे सामने घरीच पाहण्याचा पर्याय होता. यावेळी आयपीएलने टीव्ही व्यूअरशिपच्या बाबतीतही विक्रम नोंदविला आहे.
आयपीएलमध्ये बार्सिलोना विरुद्ध रियाल माद्रिद या ला लीगामधील सामन्याप्रमाणे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांतील सामन्याला लोकप्रियता मिळाली आहे. बार्कच्या म्हणण्यानुसार, चेन्नई विरुद्ध मुंबई सामना आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक पाहिलेला मध्य हंगाम सामना बनला. या व्यतिरिक्त आयपीएल २०२१ मधील सर्वाधिक पाहिला गेलेला हा सामना होता.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना १ मे रोजी खेळला गेला. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून एकूण ४३७ धावा केल्या. चेन्नईने दिलेले २१९ धावांचे लक्ष्य मुंबई इंडियन्सने अखेरच्या चेंडूवर साध्य केले आणि चार गडी राखून विजय मिळविला. या सामन्यात मुंबईचा स्फोटक फलंदाज कायरन पोलार्डने ३४ चेंडूत नाबाद ८७ धावांची खेळी केली.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, डिस्ने प्लस हॉटस्टारच्या एका सूत्राने सांगितले की, मुंबई आणि चेन्नई दरम्यानचा सामना ११.२ अरब मिनीटांसह आयपीएल इतिहासातील आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिला गेलेला आयपीएलच्या मध्य हंगामातील सामना ठरला. याखेरीज आयपीएल २०२१ मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांची एकूण रीच ३६७ दशलक्ष इतकी होती. तर, मागील हंगामात खेळल्या गेलेल्या सामन्यांची रिच ३५७ दशलक्ष इतकी होती.
असा झाला सामना
अंबाती रायुडू व फाफ डू प्लेसिस यांच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २१८ धावा धावफलकावर लावलेल्या. प्रत्युतरात मुंबई इंडियन्स अडचणीत असताना उपकर्णधार कायरन पोलार्ड याने अखेरपर्यंत नाबाद राहत ८५ धावा काढून संघाला एकहाती विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
अखेर ‘ती’ एक ट्राॅफी जिंकल्यावर क्रिकेटजगताने इंग्लंडची थांबवली होती थट्टा मस्करी
आयपीएल २०२२ मध्ये २ नव्या संघांच्या समावेशावर उभे राहिले प्रश्नचिन्ह, ‘हे’ आहे मोठे कारण
खरचं का? ११ वर्षात ११ प्रशिक्षक; भारतीय महिला संघाला २०१०पासून दरवर्षी लाभला आहे नवीन प्रशिक्षक