नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर गुरुवारी (२१ एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आमना- सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईचे दोन्ही सलामीवीर फलंदाज अपयशी ठरले. तसेच तिसऱ्या क्रमांकावरील डेवाल्ड ब्रेविस देखील स्वस्तात बाद झाला. मध्य मध्यक्रमात युवा फलंदाज तिलक वर्माणे केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.
सीएसकेविरुद्धच्या या सामन्यात तिलक वर्मामुळे (Tilak Varma) मुंबई इंडियन्सचा डाव कसाबसा सावरला. सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी मुकेश चौधरीने टाकलेल्या पहिल्याच षटकात शून्य धावेवर विकेट गमावली. तसेच, तिसऱ्या क्रमांकावरील डेवाल्ड ब्रेविस देखील अवघ्या ४ धावा करून मुकेशचा शिकार बनला. त्यानंतर मध्यक्रमात सूर्यकुमार यादव आणि तिलकने महत्वाची भागीदारी पार पाडली. सूर्यकुमारने ३१, तर तिलकने ५१ धावा केल्या. आयपीएल २०२२ मध्ये तिलक सर्वात कमी वयाचा फलंदाज आहे, ज्याने वैयक्तिक अर्धशतक केले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
चालू आयपीएल हंगामात तिलकने त्याचे पहिले अर्धशतक रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध केले होते. आरसीबीविरुद्धच्या या सामन्यात तिलकने ६१ धावा केल्या होत्या. यावेळी त्याचे वय १९ वर्ष आणि १४५ दिवस होते. आयपीएल २०२२मध्ये एखाद्या खेळाडूने सर्वात कमी वयात केलेले हे अर्धशतक ठरले. त्यानंतर आता सीएकेविरुद्धच्या सामन्यात तिलकचे वय १९ वर्ष आणि १६४ दिवस आहे आणि त्याने पुन्हा एकदा अर्धशतकी खेळी केली आहे.
A well made half-century for Tilak Varma 👏👏
His second in #TATAIPL
Live – https://t.co/tymE70gvSM #MIvCSK #TATAIPL pic.twitter.com/ggesjy1oGw
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022
या सामन्यात केकेल्या नाबाद ५१ धावांमुळे हंगामात सर्वात कमी वयात अर्धशतक करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर देखील त्याचेच नाव आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आहे, ज्याने २१ वर्ष आणि २१७ दिवसांच्या वयात अर्धशतक केले आहे. अभिषेक शर्माने सीएसकेविरुद्धच्या सामन्यात ७५ धावा ठोकल्या होत्या. याच कामगिरीच्या जोरावर तो सध्या या यादीत तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे.
दरम्यान, तिलक वर्माने या सामन्यात दिलेल्या योगदानामुळे प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सला किमान १५५ धावा करता आल्या. या धावा करण्यासाठी संघाने संपूर्ण २० षटके खेळून काढली आणि ७ विकेट्स देखील गमावल्या. सीएसकेसाठी मुकेश चौधरीने ३ षटके गोलंदाजी केली आणि १९ धावा खर्च करून ३ महत्वाच्या विकेट्स नावावर केल्या.
आयपीएल २०२२ मध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक करणारे खेळाडू
१९ वर्षे आणि १४५ दिवस- तिलक वर्मा
१९ वर्षे आणि १६४ दिवस- तिलक वर्मा*
२१ वर्षे आणि २१७ दिवस- अभिषेक शर्मा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चेन्नईच्या गोलंदाजाचा मुंबईविरुद्ध राडा! रोहित अन् इशानला शून्यावर बाद करत रचला ऐतिहासिक विक्रम
जडेजा नावालाच ‘कॅप्टन’, चर्चा रंगलीय फक्त धोनीच्या ‘गनिमी काव्या’ची