आयपीएल 2025च्या 63व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 59 धावांनी पराभव केला आहे. यासह, मुंबईने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफमधून बाहेर पडली आहे. या सामन्यात एमआय संघाने प्रथम खेळताना 180 धावा केल्या. मुंबईने शेवटच्या 2 षटकात 48 धावा जोडून ही मोठी धावसंख्या उभारली होती, ज्याच्या प्रत्युत्तरात दिल्लीला फक्त 121 धावा करता आल्या. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज नंतर मुंबई आता प्लेऑफमध्ये जाणारा चौथा संघ बनला आहे.
181 धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खूपच खराब होती. कारण 27 धावांच्या स्कोअरपर्यंत दिल्लीने तिन्ही टॉप ऑर्डर फलंदाजांचे बळी गमावले होते. केएल राहुलने सलामी करताना फक्त 11 धावा काढल्या. तर फाफ डू प्लेसिस आणि अभिषेक पोरेल या दोघांनीही प्रत्येकी सहा धावा काढल्या.
विप्रज निगम आणि समीर रिझवी यांनी काही काळ खेळपट्टीवर घालवला, पण त्यानंतर विप्रज 20 धावा करून बाद झाला. 65 धावांपर्यंत दिल्लीचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मासारखे फिनिशर देखील या सामन्यात अपयशी ठरले. समीर रिझवी एका टोकापासून खंबीरपणे उभे राहिला आणि दबावाखाली 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली, परंतु त्याला संघाला विजय मिळवून देता आले नाही.
मुंबई इंडियन्सकडून मिचेल सँटनरने चमकदार कामगिरी केली. त्याने 4 षटकांत फक्त 11 धावा देत 3 बळी घेतले. सँटनरने विप्राज निगम, समीर रिझवी आणि अशुतोष शर्मा यांना बाद केले.
MITCHELL SANTNER WHILE DEFENDING 180 IN A BIG MATCH:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 21, 2025
4-0-11-3. ????
– SANTNER BOWLED 16 DOTS WHILE CONCEDING JUST 1 FOUR. ???? pic.twitter.com/dFJWaG6nKC
Dominant victory ✅
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2025
Playoffs ✅
A dream outing for #MI in their last match at Wankhede this season as they secure a 59-run win over #DC ????????
Scorecard ▶ https://t.co/fHZXoEJVed#TATAIPL | #MIvDC | @mipaltan pic.twitter.com/mitYRgtqlZ






