आयपीएल 2025 मध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोहित शर्मा फलंदाजीने काही खास करू शकला नाही, तो केवळ 5 धावा काढून बाद झाला. त्याला मुस्तफिजूर रहमानने माघारी पाठवले. शिवाय, रोहितने क्षेत्ररक्षणात एक सोपा झेलही सोडला, त्यानंतर पुढच्याच षटकात तो मैदानाबाहेर गेला. वास्तविक, मुंबई इंडियन्सने सामना 59 धावांनी जिंकून प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माच्या नावावर स्टँड झाल्यानंतर तो पहिला सामना खेळत होता. कसोटीतून निवृत्तीनंतरचा हा त्याचा पहिलाच सामना होता. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एमआयकडून रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी डावाची सुरुवात केली पण रोहित 5 धावांवर बाद झाला.
विल जॅक्स (21) बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने 43 चेंडूत 73 धावांची शानदार खेळी खेळली. तिलक वर्माने (27) सूर्यासोबत 55 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. आशाप्रकारे संघाने 180 धावा केल्या.
— VK18 (@JiteshSharmaFC) May 21, 2025
दिल्लीच्या डावाच्या पाचव्या षटकात रोहित शर्माने मिचेल सँटनरच्या चेंडूवर विप्रज निगमचा झेल सोडला. शॉर्ट थर्ड मॅनवर उभ्या असलेल्या रोहितसाठी हा एक सोपा झेल होता पण तो तो झेल घेऊ शकला नाही. यानंतर, सर्व प्रेक्षक निराश झाले. त्यानंतर पुढच्याच षटकात रोहित शर्मा मैदानाबाहेर गेला आणि त्याच्या जागी कर्ण शर्मा मैदानात आला. रोहित पुन्हा क्षेत्ररक्षणासाठी आला नाही. सोशल मीडियावरील काही वापरकर्ते हार्दिक पांड्यावर आरोप करत आहेत की झेल सोडल्यानंतर त्याने रोहितला मैदानाबाहेर काढले.
पण असं नाहीये, खरंतर या हंगामात रोहित शर्मा जवळजवळ प्रत्येक सामन्यात फलंदाजी करण्यासाठीच मैदानात उतरला आहे. जेव्हा संघ प्रथम फलंदाजी करतो तेव्हा रोहित प्लेइंग 11 चा भाग असतो आणि दुसऱ्या डावात त्याच्या जागी कोणीतरी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येतो. जर संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करतो तर तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजी करतो.
तथापि, हा झेल सोडल्याने मोठा परिणाम झाला नाही, दिल्ली कॅपिटल्सचे फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. केएल राहुल (11), फाफ डू प्लेसिस (6), अभिषेक पोरेल (6) सारखे टॉप ऑर्डरचे खेळाडू स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर, मधल्या फळीतही चांगली भागीदारी झाली नाही. रोहितने विप्रजचा झेल सोडला, पण तो 20 धावा काढून मिशेल सँटनरच्या चेंडूवर बाद झाला. सँटनर आणि जसप्रीत बुमराह यांनी 3-3 विकेट घेतल्या.
मुंबई इंडियन्सने हा सामना 59 धावांनी जिंकून आयपीएल प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. मुंबईपूर्वी गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.






